Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोल्ड व्हॅल्यूअरसह 32 जणांनी केली महाराष्ट्र ग्रामीण बँकेची फसवणूक; शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
गुन्हेगारी

गोल्ड व्हॅल्यूअरसह 32 जणांनी केली महाराष्ट्र ग्रामीण बँकेची फसवणूक; शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 5, 2023Updated:February 5, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
तब्बल 32 आरोपींनी संगणमत करून बँकेचा विश्वासघात करत सुमारे 69 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेच्या गोल्ड व्हॅल्युवरसह 32 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरातील नामांकित बँकेमधील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे.
संगमनेर, अकोले, राहता येथील तब्बल 32 जणांचा आरोपी मध्ये समावेश असल्याने बँकिंग क्षेत्रात व ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सोनेतारण करताना आरोपींनी बनावट सोने गहाण ठेवत त्या बदल्यात तब्बल 68 लाख 94 हजार रुपयांचे कर्ज उचलले आहे. बँकेच्या लेखापरीक्षणामध्ये बनावट सोनेतारण प्रकरणाची काही पाकिटे सापडल्याने ही खाती बनावट असल्याचे तपासणीमध्ये समोर आले. या बनावट खात्याच्या माध्यमातून 68 लाख 94 हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला होता या कर्जाचे थकबाकी जानेवारीपर्यंत 72 लाख 82 हजार 652 रुपयांवर गेली आहे. बँकेचे गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे यांनी या सोन्याचे पडताळणी केली होती. त्यांनीच वैयक्तिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप आहे.
बँकेचे शाखा व्यवस्थापक नंदकिशोर नामदेव म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्यासह तब्बल 32 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 जुलै 2020 ते 13 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यातील बराच काळ देशभरात कोरोना कहर सुरू होता. याचाच आरोपींनी फायदा घेतल्याचे दिसते.
बँकेने 18 जानेवारी 2023 रोजी बँकेकडील सोन्याचे ऑडिट आणि सोन्याच्या दागिन्याचे पुनर्मूल्यांकन केले, पुनर्मूल्यांकनाच्या उद्देशाने बँकेने संगमनेर शाखेच्या तीनही पॅनल केलेल्या सुवर्णमूल्यधारकांना आमंत्रित केले होते. यावेळी केलेल्या सोने तपासणी ऑडिटमध्ये काही बनावट सोन्याची पाकिटे सापडली. या कर्ज खात्यांचे गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून जगदीश शहाणे यांनी सोन्याचे पडताळणी केली होती. त्यामुळे सोने तारण कर्जामधील गैरव्यवहारासाठी ते जबाबदार आहेत. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला असल्याने बँकेला या बनावट सोने कर्ज वितरणातून होणाऱ्या तोट्यासाठी शहाणे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

यांचा आहे आरोपींमध्ये समावेश
1) सविता दीपक जाधव रा. मालदाड रोड, संगमनेर
2) दीपक दत्तात्रय जाधव रा. महात्मा फुले नगर, संगमनेर
3) रवींद्र रमेश राजगुरू रा. गणेश विहार कॉलनी, मालदाड रोड, संगमनेर
4) संदीप नंदू कलांगे रा. बडोदा बँक कॉलनी, पोफळे मळा, संगमनेर
5) आयुब उस्मान पठाण रा. लखमीपुरा, संगमनेर
6) प्रकाश मारुती तुपसुंदर रा. माझे घर हाउसिंग सोसायटी, घुलेवाडी, संगमनेर
7) स्वप्निल भास्कर पगार रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर
8) संजय बद्री दास बैरागी रा. दत्ता देशमुख नगर, ऐश्वर्या पेट्रोल पंपामागे, संगमनेर
9) विजय भास्कर अवचिते रा. पावबाकी रोड, मारुती मंदिर जवळ, संगमनेर
10) प्रतीक नानासाहेब केरे रा. निळवंडे, ता. संगमनेर
11) कैलास रामनाथ शिरसाट रा. साखर कारखाना रोड, पानसरे मळा, घुलेवाडी, ता. संगमनेर
12) ताराबाई रावजी घुगे रा. नाशिक-पुणे रोड, संगमनेर
13) नानासाहेब भागवत राऊत रा. घुलेवाडी, ता. संगमनेर
14) मारुती अण्णासाहेब मंडलिक रा. रायतेवाडी फाटा, माळीनगर, संगमनेर
15) वैभव प्रकाश वाकचौरे माझे घर सोसायटी, घुलेवाडी, संगमनेर
16) राहुल शिवाजी गायकवाड रा. घोडेकर मळा, कासारवाडी रोड, ता. संगमनेर
17) प्रसाद संजय वरपे रा. वरवंडी ता. संगमनेर
18) लखन शांताराम कडलग रा. वडगाव पान, ता. संगमनेर
19) विशाल अनिल उगले रा. डोंगरगाव, ता. अकोले
20) मच्छिंद्र एकनाथ मंडलिक रा. जनता नगर, संगमनेर
21) सागर गोरक्ष अवचिते रा. शिबलापूर-मालुंजे, ता. संगमनेर
22) कोमल राजेंद्र जगधने रा. वाकडी, ता. राहता
23) कृष्णा भाऊसाहेब गाढवे, रा. पाण्याच्या टाकीजवळ, घुलेवाडी, ता. संगमनेर
24) सुधीर रावसाहेब घुगे रा. अमृतनगर, घुलेवाडी, ता. संगमनेर
25) प्रदीप विठ्ठल गाडेकर रा. डिग्रज रोड, मालुंजे, ता. संगमनेर
26) जगदीश सुभाष म्हसे रा. स्वामी समर्थ नगर, घुलेवाडी, ता. संगमनेर
27) अमृतराज किसन वाघमारे रा. खराडी वाघापूर, ता. संगमनेर
28) संदीप पंढरीनाथ घुगे रा. शेडगाव रोड, मालुंजे, ता. संगमनेर
29) दत्तू खंडू साळवे रा. पिंपरणे रोड, अंभोरे, ता. संगमनेर
30) गणेश भाऊसाहेब अवचिते रा. शिबलापूर रोड, मालुंजे, ता. संगमनेर
31) पुष्पा राजेश पवार रा. संगम सोसायटी, घुलेवाडी, ता. संगमनेर आणि 32) गोल्ड व्हॅल्यूवर जगदीश शहाणे रा. संगमनेर

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,004
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायी आणि प्रगतीकारक ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली…

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.