Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मॅडम तुम्ही सुद्धा; दहा हजाराची लाच स्वीकारताना महिला डॉक्टरला एसीबीने पकडले
गुन्हेगारी

मॅडम तुम्ही सुद्धा; दहा हजाराची लाच स्वीकारताना महिला डॉक्टरला एसीबीने पकडले

साडेचार हजार घेऊन आणखी मागितले होते दहा हजार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असलेल्या महिलेकडून ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याच्या कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्त्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला डॉक्टरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या बारागाव नांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी या लाचखोर महिला डॉक्टरवर अहमदनगरच्या लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.
डॉ. सूर्यवंशी यांनी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असलेल्या २६ वर्षीय राहुरी येथील महिलेकडे लाचेची मागणी केली होती. ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ या दोन महिन्याच्या कालावधीतील कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता व ऑक्टोंबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी तक्रारदार महिलेने डॉ. सूर्यवंशी यांची दोन महिन्यांपूर्वी भेट घेऊन विचारणा केली.
त्यावेळी सूर्यवंशी यांनी या तक्रारदार महिलेस तुला मिळणाऱ्या रकमेच्या निम्मी रक्कम मला द्यावी लागेल, असे सांगितले होते. गेल्या महिन्यात या महिलेने पुन्हा सूर्यवंशी यांची भेट घेतली असता आता काहीतरी रक्कम दे, तरच मी तुझ्या बिला संबंधित पुढील प्रोसेस करेल, असे सांगितले. त्यामुळे या महिलेने नाईलाजाने डॉ. सूर्यवंशी यांना आपल्या जवळील साडेचार हजार रुपये दिले.
तक्रारदार महिलेने ३ फेब्रुवारी पुन्हा सूर्यवंशी यांची भेट घेत बिलासंबंधी चौकशी केली असता निम्म्या रकमेची मागणी करत तडजोडीअंती आणखी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे या महिलेने अहमदनगरच्या लाच लुचपत विभागाशी संपर्क करत तक्रार केली. सोमवारी (६ फेब्रुवारी) पंचांसमक्ष लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्या असता आरोपी डॉ. सूर्यवंशी यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार बुधवारी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारागाव नांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. सूर्यवंशी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सूर्यवंशी यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख यांनी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्हाहळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 709
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.