Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संकेत नवलेच्या खून प्रकरणी दोघे अटकेत; तिसरा आरोपी मास्टरमाईंड की अन्य कोणी! संगमनेर पोलिसांचे मौन
गुन्हेगारी

संकेत नवलेच्या खून प्रकरणी दोघे अटकेत; तिसरा आरोपी मास्टरमाईंड की अन्य कोणी! संगमनेर पोलिसांचे मौन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या अकोले येथील मूळ रहिवासी असलेल्या संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याच्या रहस्यमय खुनाच्या तपासात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला १३ फेब्रुवारीपर्यंत तर दुसऱ्या आरोपीला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली असून संकेत नवले याचा खून करण्याचे कारण मात्र सांगण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे.
तर या प्रकरणी पोलिसांचा अजून एका तिसऱ्या आरोपीवर संशय असल्याची माहिती मिळाली आहे. हा तिसरा आरोपी या खुनामागील मास्टरमाईंड आहे की अन्य कोणी याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणात नाहक गोवल्याचा आरोप आरोपीच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपी अटक करून त्यांना पोलीस कोठडी मिळाली असली तरी पोलीस या प्रकरणी माहिती का दडवत आहे? याबाबत पोलिसांविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाहरुख हसन शेख (वय २२) व सलमान इमाम शेख (वय ३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून शाहरुख याला १४ फेब्रुवारी पर्यंत आणि सलमान याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
८ डिसेंबर २०२२ रोजी संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याचा मृतदेह संगमनेरातील सुकेवाडी रस्त्यावरील नाटकीनाल्याच्या बाजूला आढळून आला होता. शवविच्छेदनातून त्याचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. घटनास्थळावर पोलिसांना कोणत्याच वस्तू हाती न लागल्याने तपासात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले.
दरम्यान संकेत नवले यांच्या मारेकऱ्यांना लवकर पकडा या मागणीसाठी अकोल्यात मोर्चादेखील निघला होता. पोलिसांवर सामाजिक दबावदेखील होता. साधारण दोन महिन्यानंतर या खुनाचा उलगडा झाला असून दोन आरोपी अटक करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणात तिसरा आरोपी देखील असल्याची माहिती समजली असून हा आरोपी कोण हे मात्र अद्यापपर्यंत समजलेले नाही. एरवी अनेकदा गुन्ह्याच्या तपासानंतर पोलीस पत्रकार परिषदा घेऊन गुन्ह्याची उकल कशी केली याची माहिती देत असतात यावेळी मात्र पोलिसांकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने नेमकी वस्तूस्थिती काय हे अद्यापही समोर आलेले नाही.

दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून संकेत नवले याच्या खुनाचे कारण आम्ही सांगू शकत नाही. खून कसा केला, का केला या घटनेची अधिक माहिती देऊ शकत नाही. यासंदर्भात पोलीस कस्टडी दिली एवढी एकच माहिती अधिकृतरित्या देऊ शकतो बाकी अधिकृत माहिती मी देऊ शकत नाही. असे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितले. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 422
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.