Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नवलेच्या हत्या प्रकरणाचे धागेद्वारे शोधण्यासाठी पोलिसांची मदार परदेशात
पत्रकारिता

नवलेच्या हत्या प्रकरणाचे धागेद्वारे शोधण्यासाठी पोलिसांची मदार परदेशात

आरोपींची कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी देखील पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचे टाळले!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/02/2023Updated:16/02/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या संकेत नवले याच्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोन आरोपी निष्पन्न केले असले तरी त्यांच्याकडून पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती मिळविता आलेली नाही. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने देखील पोलिसांच्या मागणीवरून या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींवर तपास सुरू असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संकेत नवले या विद्यार्थ्याच्या हत्येचे प्रकरण सर्वत्र गाजत असून आता या हत्येच्या तपासाचे धागेदोरे थेट परदेशात जाऊन पोहोचले असल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे. मात्र मिळणाऱ्या माहितीच्या आधारावरच पोलिसांना यातून काय हाती लागेल हे लवकरच समोर येईल.
दरम्यान याप्रकरणी अटक केलेले आरोपी शाहरुख आणि सलमान या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. सुरुवातीला आरोपींची पोलीस कोठडी मागणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना आरोपींच्या पोलीस कस्टडीमध्ये फारशी माहिती मिळविता आलेली नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनीच न्यायालयाकडे केली. त्यामुळे संशयित आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे दिसते. तांत्रिक बाबींवर पोलिसांनी हे दोन आरोपी निष्पन्न केले असले तरी खुनामागील कारण, खून करण्यासाठी वापरलेले हत्यार, खुनाचा घटनाक्रम अद्यापही पोलिसांना उलगडता आलेला नसल्याचे दिसते. त्यामुळे अद्यापही या प्रकरणाचा पोलीस तपास सुरूच आहे. संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तसेच अद्यापही खुनाचा उलगडा न झाल्याने पोलिसांचा तपास देखील संशयाच्या जाळ्यात अडकलेला आहे.
मयत संकेत नवलेच्या अंगावर असलेल्या वस्तूंपैकी डोक्यावरील टोपी, डोळ्यावरील चष्मा, पायातील सॉक्स हे पोलिसांना अद्याप मिळून आलेले नाहीत. पोलिसांनी आरोपी शाहरुख शेख याच्या घराची झडती घेतली तरी त्यांना मयत नवले याच्या कोणत्याही वस्तू आढळून आलेल्या नाहीत. मयत नवले याचा मोबाईल देखील पोलिसांना मिळालेला नाही. असे पोलिसांनी म्हटले आहे.
मयत संकेत नवले हा कोणते मोबाईल ॲप्लिकेशन वापरत होता आणि आरोपी शाहरुख शेख कोणते मोबाईल ॲप्लिकेशन वापरत होता आणि त्या मोबाईल ॲप्लिकेशनचे मयत नवले वापरत असलेल्या ॲप्लिकेशनशी कसे साम्य होते, अशी माहिती पोलिसांकडे उपलब्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे यातील दुसरा आरोपी सलमान शेख याला मोबाईल वापरता येत नाही. त्याला मोबाईल वापरता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोबाईल वापरण्याचे ज्ञान त्याला नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. एकंदरीत या प्रकरणी पोलीस समलैंगिक संबंधाबाबत मत मांडत असले तरी खून नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला आहे. याचा स्पष्ट उल्लेख उल्लेख पोलिसांकडून होताना दिसत नाही.

पोलिसांकडून आरोपीचा छळ…

एकीकडे मयत संकेत नवले याच्या खुनाचा तपास हाच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला असतानाच दुसरीकडे आरोपीने पोलिसांकडून छळ होत असल्याची तक्रार न्यायालयाकडे केलेली आहे. त्यावरून त्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांच्या भूमिकेबाबत संशयाचे वातावरण…

दरम्यान संकेत नवले याच्या खुनाचा तपास आणि अटक केलेल्या आरोपीं बाबत पोलिसांच्या भूमिकेविषयी संभ्रमाचे वातावरण संपूर्ण शहरात पसरलेले आहे. आरोपींच्या नातेवाईकांनीदेखील पोलिसांवर आरोप केले आहेत की, आमच्या मुलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी विनाकारण त्यांना पकडले आहे. तसेच पोलिसांकडूनही याबाबत पाळली जाणारी गुप्तता आणि न्यायालयात मांडलेले मुद्दे या सर्व बाबींचा विचार करता जनतेमध्ये याप्रकरणी उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे संकेत नवले या विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणी नेमकी वस्तुस्थिती पोलीस यंत्रणेने स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 800
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.