Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विठ्ठल लांडगे सरचिटणीसपदी सुभाष मुदळ यांची एकमताने निवड
पत्रकारिता

अहमदनगर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विठ्ठल लांडगे सरचिटणीसपदी सुभाष मुदळ यांची एकमताने निवड

अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर नवीन कार्यकारिणीची निवड
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी ‘दैनिक लोकआवाज’चे विठ्ठल लांडगे यांची, तर ‘नगर स्वतंत्र’चे सुभाष मुदळ यांची सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आले असून कार्यकारिणीमध्ये 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेची कार्यकारिणी रविवारी (१९ फेब्रुवारी) २०२३ झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निवडण्यात आली. अहमदनगर प्रेस क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला व्यासपिठावर अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषशेठ गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. तर, सभेला सुमारे ९० सभासद उपस्थित होते.

सुमारे ३० वर्षानंतर अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक पदाधिकारी व सदस्य तसेच शहरातील विविध माध्यमांतील पत्रकार एकत्र आले. प्रेस क्लबची स्थापना झाली तेव्हा नगरमध्ये मोजकीच वर्तमानपत्र होती. अलीकडच्या काळात माध्यमांचा विस्तार झाला. त्यामुळे प्रेस क्लबमध्ये सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना स्थान मिळावे, हा विचार पुढे आला. त्यानुसार आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तरुण सदस्यांना स्थान देणारी नवी कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली.

संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी लवकरच धोरणात्मक बदल करण्यासाठी सभेत सहमती झाली. सभेत एकमताने निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष – विठ्ठल लांडगे (दैनिक लोकआवाज), सरचिटणीस – सुभाष मुदळ (दैनिक नगर स्वतंत्र), उपाध्यक्ष – सुशील थोरात (साम टीव्ही), उपाध्यक्ष – विजय माने (सा. दैनिक नवामराठा), खजिनदार – प्रदीप पेंढारे (दैनिक अजिंक्य भारत), सहचिटणीस – लैलेश बारगजे (झी २४ तास), कार्यकारिणी सदस्य – लहू दळवी (वृत्त छायाचित्रकार), विजय सांगळे (दैनिक आकर्षण), अशोक परुडे (लेटसअप), जी. एन. शेख (दैनिक राष्ट्र सह्याद्री), शिल्पा रसाळ (महिला पत्रकार), मुरलीधर तांबडे (दैनिक प्रभात), आफताब शेख (महाराष्ट्र निरोप्या)

दरम्यान, सभेची सुरुवात करण्यापूर्वी दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सभेच्या कामकाजाला ज्येष्ठ पत्रकार सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. सर्वात प्रथम मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. त्यानंतर सभेसमोर आलेले सर्वविषय एकमताने मंजूर करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार बाबा जाधव यांनी प्रास्ताविक केले. यानंतर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष चिंधे, शिल्पा रसाळ, करण नवले, आदिनाथ शिंदे, अशोक परुडे, लैलेश बारगजे, बहिरनाथ वाकळे, अमोल भांबरकर, बाबा ढाकणे, सुर्यकांत नेटके आदींनी सभेमध्ये मत मांडले.

सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सतीश डेरेकर म्हणाले, ‘येथून पुढे सर्वांनी पत्रकारांची एकजूट अशीच कायम ठेवावी. प्रत्येक लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ तर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांनी यावेळी दरवर्षी अहमदनगर प्रेस क्लबतर्फे २१ हजार रुपयांचे पारितोषिक उत्कृष्ट पत्रकाराला देणार असल्याचे जाहिर केले. ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे व प्रकाश कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल लांडगे म्हणाले की, ‘अहमदनगर शहरातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन काम करणार आहे. येथून पुढे अहमदनगर प्रेस क्लबची पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी (१९ फेब्रुवारी) रोजी होईल. त्याच दिवशी नवीन कार्यकारिणीकडे सुत्रे दिली जातील,’ अशी घोषणा केली. सभेचे इतिवृत्त वाचन व सूत्रसंचालन प्रदीप पेंढारे यांनी केले, तर आभार आफताब शेख यांनी मानले.

यांची होती सभेला उपस्थिती
ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाडेकर, मन्सुर शेख, शिरीष कुलकर्णी, विजयसिंह होलम, अनिल शहा, श्रीकांत वंगारी, आप्पासाहेब शेळके, अन्सार सय्यद, सागर दुस्सल, मयुर मेहता, कुणाल जायकर, संदीप खोटे, प्रशांत पाटोळे, आदिनाथ शिंदे, अशोक तांबे, रविंद्र कदम, तुकाराम कामठे, भास्कर कोडम, संतोष आवारे, सुधीर पवार, राहुल शेळके, अमोल भिंगारदिवे, सागर गोरखे, प्रविण सुरवसे, कुलदीप कुलकर्णी, विक्रम बनकर, मुकुंद भट, यतीन कांबळे, सचिन कलमदाणे, सौरभ गायकवाड, प्रविण संकपाल, अन्वर इकबाल शेख, सागर म्हस्के, विक्रम लोखंडे, इकबाल शेख, सचिन शिंदे, स्नेहा जोशी, शाहरुख शेख, वैशाली टेमकर, कविता भारद्वाज, मनिष कांबळे, उमर सय्यद, विजय मते, शबीर सय्यद, दिपक रोकडे, अतुल लहारे, अमर सय्यद, गोरख शिंदे, प्रशांत शिंदे, कबिर बोबडे, श्रीकांत खांदवे, गीताराम शिंदे, स्वामिनी मुंगीकर, सय्यद शफी, खान आसिफ, वाजिद शेख, उदय जोशी, संदीप दिवटे आदी पत्रकार उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 336
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.