Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

19/10/2026

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026

आज सोमवार, १९ ऑक्टोंबर — काय सांगतो तुमचा आजचा दिवस बघा राशीनुसार

19/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमृतवाहिनीच्या मेधा मॅरेथॉनसाठी धावले ७०० विद्यार्थी… कोण ठरले विजेते… वाचा…
क्रिडा व कला

अमृतवाहिनीच्या मेधा मॅरेथॉनसाठी धावले ७०० विद्यार्थी… कोण ठरले विजेते… वाचा…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी मेधा महोत्सवाची सुरुवात सोमवारी मेधा मॅरेथॉनने झाली असून सात किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

मेधा महोत्सव हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक महोत्सव ठरला असून याची सुरुवात या मॅरेथॉनने झाली. यशोधन जनसंपर्क कार्यालय ते इंजिनिअरिंग कॉलेज या दरम्यान झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सातशे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, ॲथलेटिक डॉ. संजय विखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, डॉ. मनोज शिरभाते, सौ जे. बी. शेट्टी, श्रीमती शितल गायकवाड, प्रा. विलास शिंदे, प्रा. विजय वाघे यांच्यासह विविध विभागांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.

यशोधन कार्यालय ते इंजिनिअरिंग कॉलेज यादरम्यान ही स्पर्धा झाली. यावेळी सुरुवातीला मेधा ढोल पथकाने सर्वांचे स्वागत केले. मुलींनी पारंपारिक फेटे बांधून केलेले ढोल वादन हे आकर्षण ठरले. तर लहान गटातील विद्यार्थ्यांनी घुलेवाडी फाटा ते इंजिनिअरिंग कॉलेज यादरम्यान या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.

याप्रसंगी डॉ. तांबे म्हणाले, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचा मेधा सांस्कृतिक महोत्सव हा राज्याचा सांस्कृतिक मानबिंदू ठरला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अभ्यास, व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम याचबरोबर व्यायाम ही त्रिसूत्री यावर्षी मेधामध्ये राबवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे मेधाचे वैशिष्ट्य आहे.

शरयूताई देशमुख म्हणाल्या, यावर्षीचा मेधा हा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला असून मॅरेथॉनमध्ये मुलींचा असलेला सहभागा कौतुकास्पद आहे. प्रत्येकासाठी आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे असून नियमित व्यायाम व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे.

स्पर्धेत हे ठरले विजेते…
◇ या स्पर्धेत शिक्षकांमधून प्रा. विलास शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
◇ मुलींमधून निकिता सुर्वे, वर्षा घुगे, अंकिता नवले, रितिका दिघे यांनी बक्षीस मिळवले.
◇ विद्यार्थ्यांमधून प्रतीक पावसे, विशाल पोरगे, विजय सोनवणे विजेते ठरले.
◇ लहान गटातून संकेत चौधरी, श्रीराम गर्जे यशस्वी ठरले.
◇ तर मुलींमधून आदिती सानप, गीता चव्हाण यांनी पारितोषिक मिळाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 180
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

By Annant Ppangarkar19/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सतीश आप्पासाहेब वाणी (वय ३५) या तरुणाने…

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026

आज सोमवार, १९ ऑक्टोंबर — काय सांगतो तुमचा आजचा दिवस बघा राशीनुसार

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.