Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

19/10/2026

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026

आज सोमवार, १९ ऑक्टोंबर — काय सांगतो तुमचा आजचा दिवस बघा राशीनुसार

19/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमृतवाहिनीचा मेधा महोत्सव हा परिपूर्ण विद्यार्थी घडविणारा: विश्वास पाटील
क्रिडा व कला

अमृतवाहिनीचा मेधा महोत्सव हा परिपूर्ण विद्यार्थी घडविणारा: विश्वास पाटील

मेधा महोत्सवाचे शानदार उद्घाटन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/02/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
इतिहासातील थोर पुरुष नायक हे युवकांसाठी सदैव आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण पेमगिरी गडावर गेले असून अहमदनगर जिल्हा हा कर्तबगार व्यक्तिमत्त्वांचा आहे. या भूमीत होत असलेला अमृतवाहिनीचा हा मेधा महोत्सव उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवणारा असल्याचे गौरवउद्गार पानिपतकार व आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांनी काढले .

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने मेधा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह अमृतवाहिनीच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, तुळशीनाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मॅनेजर प्रा. व्ही. बी. धुमाळ, मेधा समन्वय प्रा. जी. बी. काळे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. बी. एम. लोंढे, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टि. देशमुख, जे. बी. शेट्टी, श्रीमती शीतल गायकवाड, अंजली कन्नावार, डॉ. संतोष खेडेकर, प्रा. विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे, नामदेव गायकवाड आदि उपस्थित होते .

विश्वास पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्हा हा कर्तबगार पुरुषांचा आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्यासह राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आमदार बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्याची राज्याला मोठी देण आहे. आमदार थोरात यांनी ग्रामीण विकासाबरोबर संगमनेर तालुक्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास घडवून संगमनेर तालुका हा राज्यात मॉडेल बनवला आहे.

हा महाराष्ट्र संतांचा आणि वीर पुरुषांचा आहे. महाराष्ट्राला इतिहासाची मोठी परंपरा आहे. इतिहासातील थोर नायकांचा आदर्श घेऊन युवकांनी काम केले पाहिजे. सोशल मीडियाच्या जमान्यात अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा थोर पुरुषांच्या चरित्राचे वाचन आपण केले पाहिजे. संगमनेर तालुक्यातील शहागड येथे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचे तीन वर्षे गेले आहेत. शहाजी महाराजांनी पेमगिरी ही पहिली राजधानी बनवली होती असा हा समृद्ध इतिहासाचा साक्षीदार असलेला परिसर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अजून दहा वर्ष आयुष्य मिळाले असते तर त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेवर महाराष्ट्राचा झेंडा फडकवला असता.

विज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून विद्यार्थ्यांनी संघर्ष केला पाहिजे. इतिहासातील अनेक नायकांनी संघर्षातून नवा इतिहास केला निर्माण केला आहे. म्हणून कोणतेही कारण न सांगता जिद्द आणि आत्मविश्वास ठेवला तर प्रत्येकाला नक्की यश मिळेल.

रणजीतसिंह देशमुख म्हणाले, मेधा महोत्सवामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळत आहे. विद्यार्थ्यांमधील वेगवेगळ्या गुणांसाठी हे मोठे व्यासपीठ ठरले. प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी आशिष वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन हर्ष कहांडळ यांनी केले तर तुलीका फटांगरे हिने आभार मानले.

विविध उपक्रमांनी सजला मेधा महोत्सव
ढोल ताशे, लेझीम पथक आणि पारंपारिक पोशाखातील विद्यार्थी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध मॉडेलचे प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, गायन, वादन, ड्रामा, मिमिक्री अशा विविध उपक्रमांनी हा मेधा महोत्सव साजला असून यामध्ये सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

काँग्रेस नेते आमदार थोरात यांच्या शुभेच्छा…
विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मेधा महोत्सवाला ऑनलाइन पद्धतीने शुभेच्छा दिल्या असून अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने मेधा महोत्सव होत असून यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील कलागुण दाखवण्याची संधी मिळत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 186
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

By Annant Ppangarkar19/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सतीश आप्पासाहेब वाणी (वय ३५) या तरुणाने…

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026

आज सोमवार, १९ ऑक्टोंबर — काय सांगतो तुमचा आजचा दिवस बघा राशीनुसार

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.