Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासदार संजय राऊतांविरोधात शिवसेनेच्या तालुका प्रमुखाची संगमनेर पोलिसांकडे तक्रार; शहर पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
गुन्हेगारी

खासदार संजय राऊतांविरोधात शिवसेनेच्या तालुका प्रमुखाची संगमनेर पोलिसांकडे तक्रार; शहर पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी एका तक्रार अर्जाद्वारे शिवसेनेचे संगमनेर तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी शहर पोलिसांकडे केली आहे. काळे यांच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने राऊत यांच्यावर शहर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या तक्रार अर्जाच्या माध्यमातून त्यांनी राऊत यांच्या विरोधात खोटी तक्रार करणे, खोटया गुन्हयामध्ये अडकविण्याचा प्रयत्न करणे, बदनामी करणे, राजकीय पक्षांमध्ये द्वेष भावना, तेढ व वैमनस्य निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.

काळे यांनी आपल्या तक्रार अर्जात नेमके काय म्हटले आहे,

संजय राऊत, खासदार असुन सामना वृत्तमान पत्राचे संपादक आहेत. सदर श्री. संजय राऊत यांनी दिनांक २०.०२.२०२३ रोजी प्रसार माध्यमांना मुलाखत देवून त्यामध्ये हिंदी भाषेमध्ये खालीलप्रमाणे वक्तव्य केलेले आहे.

‘श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत को खतम करने की एक सुपारी, जिसे बोलते है कॉन्ट्रक्ट किलींग, एक माफिया, जो अभी अभी जमानत पे छुटा है, राजा ठाकुर उनका नाम है उनको पे कॉन्ट्रक्ट किलींग का काम दिया है, यह मेरी जानकारी है, तो मेरा यह कर्तव्य बनता है, इस राज्य के बुध्दिमान गृहमंत्री देवेंद्र फडवणीसजी, मुंबई के पुलिस कमिशनर, ठाणा के पुलिस कमिशनर को यह अवगत करे. अशाच प्रकारे मुलाखती त्यांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिण्यांना दिल्या.

तसेच तद्नंतर श्री. संजय राऊत यांनी यासंदर्भात लेखी तक्रारी अर्ज पोलीसांकडे सादर केला. श्री. संजय राऊत यांनी सदरचा खोटा अर्ज त्यांचे राजकीय व वैयक्तिक स्वार्थापोटी, प्रसिद्धी मिळणेकामी केलेला आहे.

श्री. संजय राऊत यांनी आमचे शिवसेना पक्षाचे श्रीकांत शिंदे, लोकसभेचे खासदार असुन त्यांचेवर आजतागायत गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप कधीही झालेले नाही. त्यांच्या विरोधात बदनामीकारक शब्दांचा वापर करून आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते व लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण केली. त्यामुळे मी स्वत: व माझ्यासारखे इतर कार्यकर्ते उदिग्न झालेलो आहोत. श्री. संजय राऊत यांनी सदरची मुलाखत व खोटा तकारी अर्ज देवून राजकीय पक्ष व लोकांमध्ये द्वेषाची भावना तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केलेले आहे.

तरी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांचे बाबत जाणीवपूर्वक खोटे आरोप करून, बदनामी कारक व द्वेषकारक बातमी पसरवून समाजामध्ये द्वेषाची भावना, तेढ व वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वकरित्या कृत्य केलेले आहे.

संजय राऊत यांचे सदरचे कृत्य भारतीय दंडविधानाच्या कलम २११, १५३ अ, ५००, ५०१, ५०४, ५०५-२ प्रमाणे गंभीर गुन्हा आहे. तरी सदरचे गुन्हे दखलपात्र असुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 688
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By Annant Ppangarkar01/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून…

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.