Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘केजी टू पीजी’ने अमृतवाहिनीच्या मेधा महोत्सवात भरले रंग
क्रिडा व कला

‘केजी टू पीजी’ने अमृतवाहिनीच्या मेधा महोत्सवात भरले रंग

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर :

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला मेधा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठे व्यासपीठ ठरला असून आज ‘केजी टू पीजी’ अशा अमृतवाहिनीतील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मेधा महोत्सवात रंग भरले. अमृतवाहिनीच्या मेधा मैदानावर झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी आमदार सत्यजित तांबे, आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बाबासाहेब लोंढे, प्रा. एस. टी. देशमुख, जे. बी. शेट्टी, श्रीमती शितल गायकवाड, श्रीमती अंजली कण्णावार, प्रा. विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे, नामदेव गायकवाड, नामदेव कहांडळ आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

अमृतवाहिनी न्यूडो स्कूलच्या लहानग्यांनी गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जंगल जंगल पता चला है या गीताने सर्वांना खळखळून हसवले. तर मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला फॅशन शो लक्षवेधी ठरला. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या फ्युजन लावण्याना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. तर हॉरर भुतांचा शो असलेल्या फॅशन शो ने सर्वांच्या अंगावर शहारे आले.

बी फार्मसीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले फ्युजन सॉंग लक्षवेधी ठरले. तर अमृतवाहिनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोकगीतावर सर्वांनी ठेका धरला. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भारताची एकात्मता दाखवणारा फॅशन शो सादर केला. तर अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले गोंधळी नृत्य भारावून टाकणारे होते.याचबरोबर डी फार्मसीचे गरबा नृत्य, एमबीएचे राजस्थानी नृत्य, बिहू नृत्य अशा वेगवेगळ्या दर्जेदार कार्यक्रमाने सर्वांना खिळवून ठेवले. लहान मुलांच्या फॅशन शो मधील जुगलबंदी पाहताना संगमनेरकरांच्या आनंदाला पारावर उरला नाही. विक्रमी गर्दी झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिततानी भरभरून दाद दिली. आकर्षक स्टेज व्यवस्था, डेकोरेशन, लाईट, बैठक व्यवस्था, एलईडी स्क्रीन, पार्किंग व्यवस्था, पालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था यामुळे या दर्जेदार कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभागामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांची मल्लखांब प्रात्यक्षिके…
संस्थेच्या विश्वस्त शरयु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मल्लखांब रोपवेवरील प्रात्यक्षिकांच्या वेळी अंगावर शहारे आले तर योगाचे प्रात्यक्षिकाला उपस्थित विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 212
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.