Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वृत्तपत्रे, संपादक, पत्रकारांच्या अन्यायाविरोधात आता ‘ही’ संघटना राज्यात लढा उभारणार; शासनाने सहकार्य न केल्यास आमरण उपोषण
पत्रकारिता

वृत्तपत्रे, संपादक, पत्रकारांच्या अन्यायाविरोधात आता ‘ही’ संघटना राज्यात लढा उभारणार; शासनाने सहकार्य न केल्यास आमरण उपोषण

संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक किसन भाऊ हासे यांची माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/02/2023Updated:25/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
वृत्तपत्रे संपादक पत्रकारांच्या अन्यायाविरोधात आता 20 मार्च 2023 पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी दिली.

महाराष्ट्रातील छोटी वृत्तपत्रे, संपादक व पत्रकारांना अनेक अडचणींना तोंड देऊन खडतर वाटचाल करावी लागत आहे. कागद व मुद्रण साहित्याचे भडकलेले दर व प्रचंड महागाईने त्रस्त असतांना महाराष्ट्र सरकारचे छोटी वृत्तपत्रे व त्यांच्या संपादक पत्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था हजारो संपादक पत्रकारांची झाली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्यांतर्गत असणार्‍या मुदत संपलेल्या विविध समित्यांची पुर्नरचना करावी. अनावश्यक व जाचक अटी काढून टाकाव्यात. कृतीशील संपादक पत्रकारांना या समित्यांमध्ये सहभाग मिळावा यासाठी संपादक व पत्रकार सेवा संघ, मुंबई या संस्थेने वेळोवेळी शासन स्तरावर अनेक पत्रे, निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे.

माहिती व जनसंपर्क खात्याच्या महाराष्ट्र राज्य अधिस्विकृती समितीची पुर्नरचना करावी. राज्यातील नोंदणीकृत व निकषपात्र संस्थांच्या पदाधिकार्‍यांना सहभागाची संधी मिळावी म्हणून संपादक पत्रकार सेवा संघ संस्थेने तसेच प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या संस्थेने तपशिलवार निवेदने मुख्यमंत्री, महासंचालक यांना देऊन मागणी केली आहे.

या मागणीचा गांभिर्याने विचार न होता नेहमीप्रमाणे ठराविक पात्र-अपात्र संस्थेच्या पदाधिकार्‍यांना सदस्यत्व देऊन शासकीय व अशासकीय सदस्यांची नविन अधिस्विकृती समिती जाहिर होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच किसन भाऊ हासे, अ‍ॅड. इलियास खान, मनोजकुमार आगे, राजाभाऊ कांदळकर नारायण पांचाळ यांनी तातडीने मुंबईत माहिती व जनसंपर्क सचिव व महासंचालक जयश्री भोज यांची भेट घेऊन नविन अधिस्विकृती समितीस स्थगिती द्यावी, अधिस्विकृती समितीची पुर्नरचना करावी, या संबंधीच्या अभ्यास समितीचा अहवाल जाहिर करावा, संपादक पत्रकारांच्या राज्यातील नोंदणीकृत व पात्र संस्थेंची यादी जाहिर करावी या मागण्यांचे निवेदन दिले.

राज्यातील संपादक पत्रकारांच्या मागण्यांना योग्य न्याय मिळण्यासाठी शासनाने सकारात्मक भावनेने तातडीने सहकार्य करावे. संपादक पत्रकारांच्या मागण्यांना वेळोवेळी संपर्क करूनही सहकार्य न मिळाल्यास होणार्‍या अन्यायाविरोधात 20 मार्च 2023 पासून अमरण उपोषण करण्याचा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील प्रसार माध्यम क्षेत्रातील काही व्यक्ती आपणच संपादक पत्रकारांचे तारणहार आहोत व आम्ही म्हणू तशीच समिती निर्माण करू. शासकीय अधिकारी फक्त आमचेच ऐकतात अशा बढाया मारतात व स्वार्थ साधतात. त्यामुळे अनेक संपादक पत्रकारांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरूद्ध संपूर्ण राज्यात संघटित विचारांची समन्वयी लढाई करण्यासाठी नियमित वृत्तपत्रे प्रसिद्ध करणार्‍या संपादक पत्रकारांनी या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आहे.

वृत्तपत्रे व संपादक पत्रकारांच्या अडचणींच्या, अन्यायाच्या बाबी दूर करण्यासाठी संपर्क साधावा तसेच शासनाने सहकार्य न केल्यास 20 मार्च 2023 रोजी सुरू होणार्‍या आमरण उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन किसनभाऊ हासे, अ‍ॅड. इलियास खान, नारायण पांचाळ, मनोज कुमार आगे, राजाभाऊ कांदळकर व समविचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 273
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.