Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मेधामधून विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक ऊर्जा : डॉ. जयश्री थोरात
क्रिडा व कला

मेधामधून विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक ऊर्जा : डॉ. जयश्री थोरात

'स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा'चा दिला सल्ला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर
तरुणांचा देश म्हणून भारत ओळखला जातो. सशक्त तरुण पिढी घडविण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने सातत्याने काम केले असून मेधा सांस्कृतिक महोत्सवांमधून विद्यार्थ्यांसाठी मोठी सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनीच्या मेधा महोत्सवातील अमृत कला मंच या ठिकाणी झालेल्या युवा संवाद या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी विश्वस्त शरयू देशमुख होत्या. व्यासपीठावर, कार्पोरेट ट्रेनर डॉ. रत्नाकर आहिरे, रेडिओ जॉकी अक्षय, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बाबासाहेब लोंढे, प्रा. एस. टी. देशमुख, जे. बी शेट्टी, शितल गायकवाड, अंजली कन्नवार, प्रा. विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे, नामदेव गायकवाड आदी उपस्थित होते.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, तरुणांमध्ये मोठी शक्ती आहे. मात्र या शक्तीला योग्य दिशा देण्याची गरज आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सकारात्मक व सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी घडवण्याचे काम होत आहे. मेधामध्ये विविध मोटिवेशनल व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही मोठी पर्वणी असून यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. मेधामुळे सर्वजण एकत्र येतात संवाद होतो.
सध्या युवकांमध्ये अस्वस्थपणा जास्त आहे. एकत्र आले आणि मोकळे बोलले तर अस्वस्थपणा दूर होईल. स्ट्रेस कमी करण्यासाठी बोलत रहा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. अभियंते हे नवनिर्मितीचे काम करत असतात कोणत्याही कामाकडे नव्या दृष्टिकोनातून पहा. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे निसर्गाशी एकरूप झालेले असून त्यांना निसर्ग पर्यावरण विज्ञान याविषयी अधिक काम करता येईल. असे सांगताना स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा असा आरोग्याचा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
डॉ. रत्नाकर आहिरे म्हणाले, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महापुरुषांच्या नावाच्या फक्त घोषणा देण्याऐवजी त्यांचे विचार डोक्यात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील तीन-तीन पुस्तके वाचली तर प्रत्येकाला मोठी बौद्धिक ताकद मिळेल. मात्र सध्या सोशल मीडियामुळे आपण वाचनाकडे दुर्लक्ष करतो. कोणतेही काम करताना निर्णय घ्या. चुकला तरी तो निर्णय आपला असेल. लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा. जे इतरांकडे दुर्लक्ष करून काम करतात तेच पुढे यशस्वी होतात आणि मग सर्व त्यांच्याकडेच लक्ष देतात.
रेडिओ जॉकी अक्षय यांनी मास कम्युनिकेशन, मीडिया विविध कार्यक्रम यामधून असलेल्या करिअरच्या संधी सांगताना सोशल मीडियामधूनही चांगल्या व्यवसायाच्या चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात.
यावेळी इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलीटेक्निक, एमबीए, बी फार्मसी, डी फार्मसी, आयटीआय, जुनियर कॉलेज, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल या विभागांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 167
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.