Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या पठार भागात तिघा चोरट्यांचा धुमाकूळ; रिव्हाल्व्हर रोखत पेट्रोल पंपावर केली लुटमार, माहुलीतदेखील तरुणाला शस्त्राचा धाक दाखवत मारहाण
गुन्हेगारी

संगमनेरच्या पठार भागात तिघा चोरट्यांचा धुमाकूळ; रिव्हाल्व्हर रोखत पेट्रोल पंपावर केली लुटमार, माहुलीतदेखील तरुणाला शस्त्राचा धाक दाखवत मारहाण

घारगांवात कायदा सुव्यस्थेचा बोेजवारा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर तालुक्यातील घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकूर आणि माहुली येथे रविवारी रात्री घडलेल्या दोन घटनांनी पठार भाग हादरला आहे. तीन अज्ञात चोरट्यांच्या टोळीने एका तरुणाला शस्त्राचा धाक दाखवत त्याला मारहाण करुन लुटल्याची घटना घडली तर त्यापाठोपाठ काही वेळातच साकूरमधील एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत कर्मचाऱ्यांना रिव्हाल्व्हर आणि चाकुचा धाक दाखवत पेट्रोल पंप लुटल्याची घटना घडली. पठार भागात असलेल्या स्वतंत्र घारगाव पोलीस ठाण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेलाच चोरट्यांनी आव्हान दिल्याचे यातून समोर आले. पेट्रोलपंपावरील घटनेतदेखील एकजण जखमी झाल्याची माहिती मिळते.

पहिल्या घटनेत माहुली येथे तीघा चोरट्यांनी एका लक्ष्मी टायर वर्क्समध्ये असलेल्या अनुदेव शैले या तेवीस तरुणाला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चाकुचा आणि रिव्हाल्व्हरचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन मोबाईल आणि रोकड काढून घेतली. तीघे चोरटे त्याच्याकडील एम.एच.१७ सी.ए.७२०७ या क्रमांकाची गाडी घेऊन जात असतांना चोरट्यांनी त्याच्यावर चाकुने वार करत त्याला जखमी केले.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी साकूरमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर लुटमार केल्याचे समोर आले आहे. या घटनेतदेखील एक व्यक्ती जखमी झाली. रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास साकुर ते मांडवे रस्त्यालगत असणाऱ्या भगवान पेट्रोल पंप (इंडियन पेट्रोल कंपनीचा पेट्रोल पंप) या ठिकाणी दोन मोटार सायकलवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी ही लुटमार केल्याचे सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. अनोळखी चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील फिर्यादी कर्मचारी व फिर्यादीचे सहकारी यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून आणि दहशत निर्माण करून त्यांच्याकडील २ लाख ५० हजार ७४७ रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

सुनील हरिभाऊ गिरे (वय २८ वर्षे, धंदा नोकरी, रा. गिरेवाडी, हिवरगाव पठार, ता. संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. या घटनेत अनुदेव अनंत वाटूशरे (रा. घारगाव, ता. संगमनेर) ही व्यक्ती जखमी झाली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

अवघ्या तीन व्यक्तींनी मोटरसायकलवरून येत रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दोन्ही ठिकाणी लुटमार केली आहे. रात्रीच्यावेळी घडलेल्या या घटनांवेळी संबंधितांच्या मदतीस कोणीही धावून आले नसल्याची माहिती समजली आहे. दोन्ही घटनासंदर्भात घारगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 517
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.