Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांच्या दरबारी; साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेची न्याय देण्याची मागणी
आंदोलन

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांच्या दरबारी; साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेची न्याय देण्याची मागणी

महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
२० फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रव्यापी बेमुदत संपाच्या अनुषंगाने साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेच्यावतीने अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यासंदर्भात अहमदनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जनता दरबारामध्ये पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामध्ये महाराष्ट्र साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेची संगमनेर येथील संघटना देखील सहभागी झाली आहे. महाराष्ट्र सरकारकडे अनेक वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने सतत याबाबत पाठपुरावा करण्यात आलेला आहे.

सविस्तर मागण्या पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या असून त्यात प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, मानधन वाढीचे आश्वासन पूर्तता करणे, माननीय सर्वोच्च न्यायालय रीट पिटीशन ३१५३/२०२२ अन्वये अंगणवाडी कर्मचारी पेमेंट ऑफ ग्रॅज्युईटीनुसार ग्रॅज्युईटी मिळणेस पात्र आहे, असा निर्णय न्यायालयाने २५ एप्रिल रोजी दिलेला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी विनाविलंब पूर्वालक्षी प्रभावाने करण्यात यावी. संदर्भीय पत्रांमध्ये नमूद केल्याप्रमाणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्याशी झालेल्या बैठकीत मान्य केलेल्या मुद्द्याबाबत तातडीने निर्णय घेणे तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेतन श्रेणी लागु करण्यात यावी. पेन्शन लागू करण्यात यावी. मिनी अंगणवाडी मोठी करण्यात यावी. अंगणवाडी मदतनिसांना अंगणवाडी सेविकेप्रमाणे पेमेंट असावे. अंगणवाडी केंद्र हे फक्त भात शिजवण्यासाठी नव्हे तर देशांमध्ये सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत आहे. याचीही दखल घ्यावी.

कोविड २०१९ च्या विषाणू संसर्ग काळातही जीवाची पर्वा न करता किती मानधन मिळते याचा विचार न करता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दोन वर्ष महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार कामकाज केलेले आहे. या कालावधीमध्ये देखील आमच्या मागण्याबाबत तत्कालीन सरकारने कोणताही विचार केला नाही व आम्हाला न्याय दिला नाही.

त्यामुळे राज्यव्यापी बेमुदत संपात साई श्रद्धा अंगणवाडी संघटना सहभागी झाली आहे. सरकारने संपाची तातडीने दखल घेत संगमनेर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना न्याय द्यावा. असे या निवेदनात म्हटले आहे.

पालकमंत्र्यांना निवेदन देतेवेळी महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेच्या तालुका अध्यक्ष अनिता वाकचौरे, उपाध्यक्ष रतन एखंडे, सचिव प्रमिला निळे, कार्याध्यक्ष मंगल गुंजाळ, भारती जोंधळे, ललिता चकोर, सरला सानप आदींसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस व मिनी सेविका उपस्थित होत्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 315
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.