Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमृतवाहिनीच्या मेधा तारांगणात राज्यभरातील विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सहभाग; मराठी चित्रपट तारे तारकांची मोठी उपस्थिती… हे ठरले विजेते
क्रिडा व कला

अमृतवाहिनीच्या मेधा तारांगणात राज्यभरातील विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सहभाग; मराठी चित्रपट तारे तारकांची मोठी उपस्थिती… हे ठरले विजेते

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरयू देशमुख व राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या मेधा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांसह मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री पार्श्वगायक, गीतकार ,संगीतकार यांच्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांची राहिलेली उपस्थिती हे या मेधाचे वैशिष्ट्य ठरले असून मेधा कपमध्ये अमृतवाहिनी बी फार्मसी प्रथम, अकोले कॉलेज द्वितीय तर इस्लामपूर येथील सांगली कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने मेधा मैदानावर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, व्यवस्थापक प्रा. व्ही बी धुमाळ, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्रा. विलास शिंदे यांच्यासह मराठी अभिनेत्री कृतिका गायकवाड, अभिनेता पृथ्वीराज, कालिंदी, पार्श्वगायक हर्षवर्धन वावरे, नितीन उगलमुगले, ओंकार स्वरूप बागडे आदी उपस्थित होते.

अमृतवाहिनीतील मेधा महोत्सवात गायन, वादन, ड्रामा, मिमिक्री, नृत्य, सामूहिक नृत्य, रांगोळी पथनाट्य यांसह 28 इव्हेंटमधून 1140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मेधा कपमध्ये इस्लामपूर, सांगली, औरंगाबाद, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, अकोले या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षनिय ठरली. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक हर्षवर्धन वावरे व नितीन उगलमुगले यांनी आपले गीते सादर केली. याचबरोबर टाइमपास थ्री या चित्रपटाची नायीका कृतिका गायकवाड हिने चंद्रा या गीतावर लावणी सादर केली. या समवेत आगामी येणाऱ्या टिडीएम चित्रपटाचा नायक पृथ्वीराज व कालिंदी यासह बबन व ख्वाडा सिनेमाचा गायक ओंकार स्वरूप बागडे यांनीही विविध गीते सादर केली. या कलाकारांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.

मेधा कपमध्ये महाविद्यालयीन गटात अमृतवाहिनी बी फार्मसीने प्रथम क्रमांक, अगस्ती कॉलेज अकोले द्वितीय क्रमांक व इस्लामपूर सांगली महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला तर माध्यमिक विद्यालय गटात अभिनव पब्लिक स्कूल अकोलेने प्रथम क्रमांक, पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावा द्वितीय क्रमांक व अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांना 21000 रुपये 15000 रुपये व 11000 रुपये रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली आदिवासी नृत्य, कोळीगीत, शंकराचे तांडव, भांगडा सॉंग, मराठमोळ्या लावण्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, भारतीय सैन्याची जीवनगाथा हे कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले.

यावेळी डॉ. बाबासाहेब लोंढे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टी. देशमुख, जे. बी. सेट्टी, अंजली कन्नवार, नामदेव गायकवाड, प्रा. अशोक वाळे, प्रा. विजय वाघे आदींसह चैतन्य जोशी, आशिष वर्पे, रुक्मिणी देशमुख हे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर प्रा जी.बी काळे यांनी आभार मानले .

मेधा 2023 फायरवर्क्सची आतिषबाजी

मेधा मैदानावर असलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईसह नायगारा धबधबा दर्शवणारी फायर वर्क्स, त्याचबरोबर फुलझडयाचा वर्षाव, आकाशातील आतिशबाजी हे या मेधाचे खास आकर्षण ठरले असून सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या या आतिषबाजीमुळे मेधा 2023 हा संस्मरणीय झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 196
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.