Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात महिलांसाठी टेनिस बॉल क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती आणि रस्सीखेच स्पर्धा… डॉ. जयश्री थोरात यांचा पुढाकार
क्रिडा व कला

संगमनेरात महिलांसाठी टेनिस बॉल क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती आणि रस्सीखेच स्पर्धा… डॉ. जयश्री थोरात यांचा पुढाकार

महिला दिनानिमित्ताने ८ ते १० मार्च दरम्यान रंगणार स्पर्धांचा थरार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
महिला आणि युवतींचे सबलीकरण, आरोग्याच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधित ८ ते १० मार्च दरम्यान महिलांच्या क्रिकेट कुस्ती बॅडमिंटन आणि रस्सीखेच स्पर्धांचा थरार रंगणार असल्याची माहिती एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली.

राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमत:च या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आणि युवतींसाठी टेनिस बॉल क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती आणि रस्सीखेच स्पर्धा संगमनेर मधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात होणार आहेत.

थोरात म्हणाल्या, आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. यानिमित्त संगमनेरमध्ये दरवर्षी महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. महिला सर्व क्षेत्रात पुरुषांबरोबर काम करत आहेत हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. यावर्षी महिला क्रिकेटमध्ये आयपीएल सुरू होत असून यामध्ये संगमनेर तालुक्यातील मुलींचा सहभाग आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये होणाऱ्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील युवतींचे विविध क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. तसेच राज्यभरातूनही काही मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. या संघाना ड्रेस कोड देण्यात आले असून स्पर्धेसाठी मैदान, एलईडी व्यवस्था, कॉमेंट्री व्यवस्था, बैठक व्यवस्था, खेळाडूंसाठी स्वतंत्र व्यवस्था आदी स्पर्धेची अद्यावत तयारी करण्यात आली आहे.

याचबरोबर शालेय व महाविद्यालय विद्यार्थिनी, तरुणी व महिलांसाठी बॅडमिंटन कुस्ती व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजनही याच क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. यासाठीही सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त महिला, तरुणी व विद्यार्थिनींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 166
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.