Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खेलो इंडिया महिला योगासन लीगचे आयोजन! महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम
क्रिडा व कला

खेलो इंडिया महिला योगासन लीगचे आयोजन! महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम

पुण्याच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये रंगणार स्पर्धा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
महाराष्ट्र व गोवा या राज्यातील महिलांसाठी महिला दिनाच्या निमित्ताने ‘खेलो इंडिया – दस का दम’ या नावाने योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या 12 मार्च रोजी पुण्यातील सूस येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारच्या या स्पर्धा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.

वय वर्ष 9 ते 18 आणि 19 ते 55 अशा दोन गटात होणार्‍या या योगासन स्पर्धेत पारंपरिक व कलात्मक या दोन क्रीडा प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारात महाराष्ट्र आणि गोव्यातील कोणत्याही महिला स्पर्धकाला सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी तयार केला गेलेला अभ्यासक्रम नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशनच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याचे स्पर्धेच्या तांत्रिक प्रमुख स्नेहल पेंडसे यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी कोणतेही सहभाग शुल्क आकारले जाणार नाहीत. पुण्याशिवाय राज्यातील कोणत्याही भागातून येणार्‍या महिला स्पर्धकांसाठी ध्रुव ग्लोबल स्कूलच्यावतीने शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकासह पुणे रेल्वे स्थानकावरुन स्पर्धास्थानी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 8149602867 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धा व्यवस्थापक डॉ. सुनंदा राठी यांनी केले आहे.

रविवारी (12 मार्च) सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या स्पर्धा होणार आहेत. एकुण बारा विजेत्यांना पारितोषिके व सर्व स्पर्धकांना सहभागासाठी प्रशस्तिपत्र दिले जाणार असल्याचे स्पर्धा समन्वयक शुभदा भाटे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील महिला योगासन क्रीडापटूंनी या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सचिव उमेश झोटींग यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 264
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.