Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांची को जनरेशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी बिनविरोध निवड
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांची को जनरेशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी बिनविरोध निवड

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ भाऊराव घुगरकर यांची राष्ट्रीय पातळीवरील को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर वाटचाल करणाऱ्या या कारखान्याने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दिशादर्शक काम केले आहे. मागील हंगामात 15 लाख 53 हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी गाळप करताना दरवर्षी सातत्याने विक्रमी भाव दिला आहे.

याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुढील पन्नास वर्षाचे नियोजन करून या कारखान्याने 5500 मेट्रिक टन क्षमता व 30 मेगावॅट वीज निर्मितीचा नवीन प्रकल्प कार्य सुरु केला आहे. हा प्रकल्प सहकारातील कारखानदारीसाठी मार्गदर्शक ठरला. कारखाना कामकाज, व्यवस्थापन, कामगार कल्याण, सभासद, शेतकरी या सर्वांच्या बरोबर समन्वय आणि उत्कृष्ट गुणवत्ता यामुळे घुगरकर यांना दोन महिन्यापूर्वी इंडस्ट्री एक्सलन्स हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला होता.

आता को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या पंचवार्षिक संचालकपदी घुगरकर यांची निवड झाल्याने संगमनेरच्या सहकाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

घुगरकर यांचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 212
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.