Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » योजनेचे मालक असल्यासारखे वागू नका, बैठकीत पालकमंत्री विखे पाटलांनी ठेकेदारांना सुनावले
विकास

योजनेचे मालक असल्यासारखे वागू नका, बैठकीत पालकमंत्री विखे पाटलांनी ठेकेदारांना सुनावले

तळेगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ७१ कोटीची निविदा, मंत्री विखेंनी काम थांबविले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/03/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
जलजीवन मिशनची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये कुठेही शासनाची बदनामी होणार नाही याची दक्षता गावपातळीवरील कार्यकर्त्यांसह ठेकेदारांनी घेतली पाहीजे. शासनाच्या निधीतून काम करणाऱ्या ठेकेदारांनी आपण योजनेचे मालक असल्यासारखे वागू नका, अशा कडक शब्दात महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत सुनावले.

जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संगमनेर-अकोले तालुक्यातील सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा परीषदेच्या कार्यकारी अभियंत्यांसह तहसिलदार, गटविकास अधिकारी, माजी आमदार वैभव पिचड याप्रसंगी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी प्रामुख्याने योजनेच्या कामातील त्रृटी गावनिहाय कार्यकर्त्याकडून जाणून घेतल्या. काम घेवूनही बहुतेक गावात ठेकेदार कामाच्या ठिकाणी फिरकले नाहीत गावातील पदाधिकारी त्यांना माहीत नसल्याची बाब यामुळे समोर आल्याने मंत्री विखे पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेधर धरून कोणत्या ठेकेदारांनी योजनांची किती काम घेतली याची माहीतीच जाहीर करण्यास भाग पाडले. यामध्ये अनेकांनी कंत्राट घेवून ती काम दुसऱ्यांना करायला दिली असल्याची बाब पुढे आल्याने योजनेच्या कामात कुठेही समन्वय राहीला नसल्याचे मंत्री विखे पाटील यांनी अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले.

योजनेच्या कामात पारदर्शकता राहावी यासाठी, प्रत्येक गावात योजेनेच्या माहीतीचे फ्लेक्स बोर्ड लावण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी दिल्या. यामध्ये योजनेसाठी उपलब्ध झालेला निधी, योजनेची तांत्रिक माहीती याचीही स्पष्टता असावी. तसेच योजनेच्या कामासाठी अभियंता, ठेकेदार किती वेळा गावात आणि कामांना भेटी देण्यासाठी येतात याचे रजिस्टर तयार करण्याचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात तातडीने द्यावेत, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

बहुतांशी गावात या योजनेत जागा उपलब्ध होण्यात वन खात्याच्या अडचणी येत आहेत. यासाठी पाणी पुरवठा विभाग आणि वन विभागाने समन्वय बैठक घेवून यामध्ये तातडीने मार्ग काढण्याबाबत त्यांनी सूचित केले.

तळेगाव पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीसाठी ७१ कोटी रुपयांची निविदा निघाल्याबाबत आश्चर्य व्यक्त करून एवढ्या निधीतून काय करणार हे कळू द्या, हे काम सुध्दा कोल्हापूरच्या ठेकेदाराने घेतल्याचे उघड झाल्याने हे काम थांबविण्याचे आदेश त्यांनी दिले. विभागांच्या सचिवांच्या उपस्थितीत यासाठी बैठक घेण्याबाबत बैठकीत निर्णय करण्यात आला.

जलजीवन मिशन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिशन मोडवर काम करीत असून या योजनेत शासन कुठेही बदनाम होणार नाही. याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे. उगाच गावपातळीवरचे व्यक्तिगत वाद या योजनेत येणार नाहीत याचीशी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांना दिल्या.

या बैठकीला भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, डॉ. अशोक इथापे, वसंतराव देशमुख, बापुसाहेब गुळवे, साहेबराव नवले, कैलास तांबे, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, भीमराज चत्तर, डॉ. सोमनाथ कानवडे, वैभव कानवडे, संदीप देशमुख, अमोल खताळ, जावेदभाई जहागिरदार, अशोक कानवडे यांच्यासह विविध गावातील पदाधिकारी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ठेका कसा मिळविला याची वाच्यता करायला लावू नका!

कोणत्याही ठेकेदाराबाबत आपला व्यक्तिगत आकस नाही. हे शासनाचे काम असल्याने नियमाने गुणवतेने आणि सार्वजनिक हिताचे व्हावे, हाच आपला दृष्टीकोन आहे. परंतू ठेकेदार राजकारण आडवे आणून गावाला वेठीस धरणार असतील तर आपल्याला ते चालणार नाही. तुम्ही कामाचा ठेका मिळवला असला तरी तो कसा मिळवला याची वाच्यता करायला लावू नका, अशा शब्दात त्यांनी ठेकेदारांना सुनावले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,279
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.