Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आधी ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की केली… ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले आणि नंतर केबिनचेच नुकसान करीत जीवे मारण्याची दिली धमकी
गुन्हेगारी

आधी ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की केली… ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले आणि नंतर केबिनचेच नुकसान करीत जीवे मारण्याची दिली धमकी

संगमनेर तालुक्यातील अंभोरे ग्रामपंचायतीत घडला प्रकार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या व्यक्तीने ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ धक्काबुक्की करत कार्यालयात कोंडून घेतले नंतर पुन्हा येत ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या केबिनचे नुकसान करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे घडली आहे.

या संदर्भात ग्रामविकास अधिकारी अरुण गोविंद जेजुरकर (वय ५० वर्षे, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल संजय गायकवाड याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी, आरोपी विशाल गायकवाड हा शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंभोरे ग्रामपंचायत कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत आला होता. त्याने गाय गोठा यादी दाखविण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी जेजुरकर यांच्याकडे केली असता जेजुरकर यांनी त्याला ‘तू आता दारूच्या नशेत आहेस, उद्या सकाळी ये’, असे म्हटल्याचा राग आला आणि मला आत्ताच्या आत्ता गाय गोठा यादी पाहिजे असे म्हणत गायकवाड याने जेजुरकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जेजुरकर यांनी तु शिवीगाळ करू नको, असे समजावून सांगत असताना गायकवाड यांनी जेजुरकर यांच्या शर्टची गचांडी धरून धक्काबुक्की केली.

त्यावेळी रामनाथ दशरथ बर्डे गणेश भिमराज साळवे यांनी गायकवाड याला कार्यालयाबाहेर काढले असता गायकवाड याने बाहेर आल्यावर कार्यालयाला बाहेरून कडी लावून घेतली आणि फिर्यादी आणि साक्षीदार यांना बाहेर जाण्यास अडथळा निर्माण करीत सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे फिर्यादी जेजुरकर यांनी गायकवाड त्याच्या चुलते एकनाथ गायकवाड यांना फोन करून बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर एकनाथ गायकवाड यांनी ग्रामपंचायत कार्यालय उघडून आरोपी विशाल गायकवाड याला आपल्यासोबत नेले.

त्यानंतर काही वेळाने आरोपी गायकवाड हा पुन्हा हातामध्ये रॉड घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्याने हातातील रॉडने ग्रामसेवकाच्या केबिनचा दरवाजा तोडत नुकसान केले तसेच जेजुरकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरून गायकवाड यांच्या विरोधात भारतीय दंड विधानसभेच्या विविध कलमानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 553
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.