Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साईतीर्थ हे संस्कारांची शिकवण देणारे आधुनिक तीर्थक्षेत्र: रामगिरी महाराज
इतिहास

साईतीर्थ हे संस्कारांची शिकवण देणारे आधुनिक तीर्थक्षेत्र: रामगिरी महाराज

शिर्डीतील साईतीर्थ थीम पार्कमध्ये देशातील सर्वात मोठ्या रुबिक क्यूब साई प्रतिमेचे उद्घाटन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी:
आपली संस्कृती पुढे नेताना रुबिक क्यूब सारख्या साहित्याच्या माध्यमातून तयार केलेली देशातील सर्वात भव्य साई प्रतिमा शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल. साईतीर्थ हे संस्कारांची शिकवण देणारे आधुनिक तीर्थक्षेत्र असल्याचे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.

साई तीर्थ थीम पार्कमध्ये चिन्मय प्रभू या तरुणाने तयार केलेल्या देशातील सर्वात मोठ्या रुबिक क्यूब साई प्रतिमेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी उपस्थित होते.

रामगिरी महाराज म्हणाले, आजची तरुण पिढी भारतीय संस्कृती आणि परंपरांपासून दूर चालली आहे, अशा पिढीला आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून भारतीय संस्कृती आणि आपल्या समृद्ध वारशाची ओळख करून देण्याचे काम साईतीर्थ या आधुनिक तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून मालपाणी परिवार करीत आहे.

डॉ. मालपाणी म्हणाले, शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना साई दर्शनानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साईंची महती सांगण्याचे काम आम्ही साईतीर्थच्या माध्यमातून करीत आहोत.

उद्घाटन समारोहानंतर महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थित मान्यवर व शिर्डीतील पत्रकारांसमवेत साईतीर्थ थीम पार्कमधील तीर्थयात्रा, द्वारकामाई, लंका दहन फाइव्ह डी शो आणि सबका मलिक एक या कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी सराला बेटाचे विश्वस्त मधु महाराज, बाळासाहेब कापसे, नीलेश जपे, बाळासाहेब चिडे यांच्यासह सराला बेटाच्या भक्त परिवाराचे सदस्य कमलाकर कोते, संदीप पारख, तुषार मते, वैभव रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनुप बजाज, सचिन डांगे, मधुसूदन शिंदे, पार्श्व चोरडिया, अशोक जेजुरकर, रोहित कराड, गौतम खवले आदींनी विशेष परिश्रम घेतले.

साईतीर्थ थीम पार्कमध्ये ४ हजार २१२ रुबिक क्यूबचा उपयोग करून मुंबईस्थित चिन्मय प्रभू या युवकाने साई प्रतिमा तयार केली आहे. त्याच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. या प्रतिमेचा अनावरण सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी चिन्मय प्रभू व त्याला ही प्रतिमा साकारण्यासाठी मदत करणाऱ्या प्रिन्स त्रिवेदी तसेच चिन्मयच्या आई वडिलांचा महंत रामगिरि महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 347
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

01/07/2026

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

14/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.