Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026

अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या ‘या’ तरुणाला पोलिसांनी पकडले; ५० हजारांचे अग्निशस्त्र जप्त

02/10/2026

मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे
इतिहास

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

आज देशात सत्य आणि असत्याची लढाई सुरू असून, दुर्दैवाने सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे नैतिकतेचा अभाव दिसतो.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

वेगवेगळ्या ५०० राजांच्या अधिपत्याखाली विखुरलेल्या देशाला एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले. बलाढ्य आणि जुलमी ब्रिटिशांविरुद्ध भारतातील गोरगरीब व सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकत्र आणून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांची नैतिकता व निर्भयता ही मूल्ये जगासाठी अनुकरणीय असून, महात्मा गांधींमुळे संपूर्ण जगात भारताची मोठी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरात भव्य प्रभात फेरी व गांधी भजनांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयापासून या प्रभात फेरीला सुरुवात झाली.

या प्रभात फेरीत महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील १५७ विद्यार्थी आणि कस्तुरबा गांधी यांच्या वेशभूषेतील १०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. नाशिक-पुणे महामार्गावरून निघालेल्या या प्रभात फेरीत ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आणि गांधी भजनांनी संपूर्ण संगमनेर शहर दुमदुमून गेले. या फेरीत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे व नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे स्वतः सहभागी झाल्या होत्या.

संगमनेर बसस्थानक येथे कार्यक्रमाचा मुख्य सोहळा पार पडला. याप्रसंगी बसस्थानक परिसरात तुषार भोसले यांनी महात्मा गांधींची आकर्षक रांगोळी काढली, सुगंध जाधव यांनी तैलचित्र रेखाटले, तर ओंकार मोरे व कृष्णा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसमोर महात्मा गांधींची सुंदर मूर्ती साकारली.

डॉ. तांबे म्हणाले की, महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांमुळेच जगात भारताला विशेष सन्मान मिळतो. गांधीजींनी देशाला अहिंसा आणि सत्याचा मार्ग दाखवला. असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह, चलेजाव आंदोलन यांसारख्या लढायांसोबतच त्यांनी २१ सामाजिक चळवळी राबवल्या. आज देशात सत्य आणि असत्याची लढाई सुरू असून, दुर्दैवाने सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे नैतिकतेचा अभाव दिसतो. गांधीजींबद्दल कितीही अपप्रचार केला तरी त्यांचे विचार शाश्वत असून ते कधीही नष्ट होऊ शकत नाहीत.

या प्रसंगी हिरालाल पगडाल आणि दुर्गाताई तांबे यांनीही आपले विचार मांडले. लोकनेते थोरात यांच्या नेतृत्वाखाली गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान प्रा. विनोद राऊत, अविनाश कदम, गणेश गोरडे, मंगेश बिडवे व सौरभ रणधीर यांनी ‘रघुपती राघव राजाराम’, ‘वैष्णव जन तो’, ‘दे दी हमें आजादी’, ‘साबरमती के संत’ यांसारखी बापूंची आवडती भजने सादर केली. उपस्थितांनी या भजनांमध्ये हिरिरीने सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला डॉ. नामदेवराव गुंजाळ, प्रा. बाबा खरात, प्रकाश पारखे, डॉ. बाळासाहेब वाघ, एस. एम. खेमनर, ॲड. मधुकर गुंजाळ, सुरेश झावरे, निखिल पापडेजा, अनंत शिंदे, हर्षल थेटे, चांगदेव खेमनर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश पारखे यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 80
जयहिंद लोकचळवळ महात्मा गांधी जयंती लाल बहादूर शास्त्री जयंती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
इतिहास

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

By Annant Ppangarkar02/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वेगवेगळ्या ५०० राजांच्या अधिपत्याखाली विखुरलेल्या देशाला एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य…

अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या ‘या’ तरुणाला पोलिसांनी पकडले; ५० हजारांचे अग्निशस्त्र जप्त

02/10/2026

मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!

02/10/2026

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.