Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याचा गुरुवारी गळीत हंगाम सांगता समारंभ; काँग्रेस नेते आमदार थोरात यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा
शेती व सहकार

थोरात कारखान्याचा गुरुवारी गळीत हंगाम सांगता समारंभ; काँग्रेस नेते आमदार थोरात यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2023Updated:26/03/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर :
सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 – 23 या गळीत हंगामाचा सांगता समारंभ व सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा गुरुवारी (30 मार्च) सकाळी 9 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात यांच्या उपस्थितीत व चेअरमन बाबा ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रिक टनाचे उच्चांकची गाळप केले होते. तर या हंगामात 10 लाख मेट्रिक टनाच्यावर गाळप झाले आहे.
सभासद, शेतकरी, कामगार ऊस उत्पादक या सर्वांच्या हिताचे निर्णय घेत कारखान्याला राष्ट्रीय व राज्य पातळीवर विविध पुरस्कार मिळाले आहेत. संगमनेर तालुका हा एक परिवार असून कारखान्यात अनेक वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा व आयुष्याची 75 वर्षे पूर्ण करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, राजेश मालपाणी, सोमेश्वर दिवटे यांच्यासह तालुक्यातील व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 304
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.