Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खोटे सोने खरे असल्याचे भासवत संगमनेरमधील आणखी एका बँकेची सुमारे ८३ लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युवरसह २३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
गुन्हेगारी

खोटे सोने खरे असल्याचे भासवत संगमनेरमधील आणखी एका बँकेची सुमारे ८३ लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युवरसह २३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणेचा जी. एस. महानगर बँकेतील कारनामा आला समोर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
शहरातील अनेक बँकांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासणाऱ्या आणि त्या माध्यमातून सोनेतारण करणाऱ्या कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्या माध्यमातून आणखी एका बँकेचे तब्बल 83 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामुळे येत्या काही दिवसात आणखी काही बँकांमधील घोटाळे समोर येण्याची शक्यता बळावली आहे. या घोटाळ्यांमुळे या बँकांची विश्वासार्हतादेखील धोक्यात आली आहे.

मुंबई येथील प्रतिष्ठित असलेल्या जी. एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेची संगमनेरमध्ये शाखा आहे. या बँकेत खोट्या सोन्याचा माध्यमातून २३ कर्जदारांनी बँकेची ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्यासह २३ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधीच्या गुन्ह्यातील आणि या गुन्ह्यातील काही आरोपी तेच-तेच असल्याचे दिसते.

गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्या माध्यमातून यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संगमनेर शाखेत सुमारे 68 लाख, नासिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संगमनेर शाखेत सुमारे सव्वाचार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे गुन्हे यापूर्वीच दाखल झालेले आहेत. त्यात आता आणखी या एका नवीन गुन्ह्याची भर पडली आहे. यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या फसवणूक प्रकरणात शहाणे याच्यासह काही आरोपींना संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.

दरम्यान महानगर बँकेचे व्यवस्थापक शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १ जुलै २०१६ पासून जगदीश शहाणे हा बँकेत गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून काम पाहत आहे. शहाणे यांनी सोनेतारण करणाऱ्या कर्जदारांच्या सोन्याची शुद्धता तपासणी करून त्या संदर्भात ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेच्या नियमानुसार सोनेतारण कर्ज दिले जाते. कर्जदाराकडे सोने खोटे निघाल्यास त्यास गोल्ड व्हॅल्यूअर आणि कर्जदार जबाबदार असतो.

दरम्यान गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्या विरोधात सोनेतारण कर्ज प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती माध्यमांमधून बँकेचे व्यवस्थापक शिंदे यांना समजली होती. त्यामुळे शिंदे यांनी याची माहिती तातडीने आपल्या बँकेच्या मुख्य शाखेला दिली. बँकेच्या व्यवस्थापनाने गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्यासह सोनेतारण कर्जदारांना नोटीसा पाठवून दागिन्यांची तपासणी करण्यासाठी बँकेत हजर राहण्यास कळविले होते. या तपासणीमध्ये २३ कर्जदारांचे सोने बनावट असल्याचे आढळून आले. या कर्जदारांनी बँकेची ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

जी. एस. महानगर बँकेची फसवणूक करणारे आरोपी खालील प्रमाणे…

गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. एकता चौक मालदाड रोड, ता. संगमनेर), राजेश केशवराव नेवासकर (रा. गणेशनगर ता. संगमनेर), शशिकला विश्वनाथ पवार (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), शरद मारुती पर्बत ( रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर), महेश रामचंद्र जोशी (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), मुकुंद मुरलीधर उपरे (रा. साळीवाडा, ता. संगमनेर), योगेश शंकर सुर्यवंशी (रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर), संदिप नंदलाल काळंगे (रा. इंदिरानगर ता. संगमनेर), आयुब उस्मान पठाण (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) नवनाथ भरत घोडेकर (रा. घोडेकरमळा ता.
संगमनेर), नाजीम अब्दुलमान शेख (रा. मोगलपुरा, ता. संगमनेर), रविंद्र रमेश राजगुरू (रा. मालदाड रोड, ता. संगमनेर) सचिन मनलभाऊ होलम (रा. सय्यदबाबा चौक ता. संगमनेर), अनिल राजाराम पावबाके (रा. पावबाकी रोड, ता. संगमनेर) ज्ञानेश्वर त्रंबक पगारे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), राजेंद्र काशिनाथ वाकचौरे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) प्रतिक नानासाहेब केरे (रा. निळवंडे, ता. संगमनेर), विजय भास्कर अवचिते (रा. पावबाकी रोड, ता. संगमनेर), रामभाऊ भावका पुणेकर
(रा. डीग्रस, ता. संगमनेर), विशाल काशिनाथ वाकचौरे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), उषा शिवाजी दुधवडे (रा. सावरगावतळ, ता. संगमनेर), वैभव प्रकाश वाकचौरे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), राजेश विश्वनाथ पवार (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 947
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.