Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘हिंदूंच्या मुलींना घेऊन बसतो का’, या कारणावरून दोघांचे अपहरण करून मारहाण; लव्ह जिहादचा संशय, आठ तरुणांना अटक
गुन्हेगारी

‘हिंदूंच्या मुलींना घेऊन बसतो का’, या कारणावरून दोघांचे अपहरण करून मारहाण; लव्ह जिहादचा संशय, आठ तरुणांना अटक

शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर
‘हिंदूंच्या मुलींना घेऊन बसतो का’ या कारणावरून दहा ते पंधरा जणांनी दोघा तरुणांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी संगमनेर शहरात आणि शहरालगतच्या खांजापूर जवळील विठ्ठलकडा येथे घडली. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान या प्रकरणाला लव्ह जिहादचा संशय निर्माण झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह पोलिसांनी सतर्कता दाखविल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली. शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आठ जणांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

दोन तरुण एका तरुणीसोबत मालदाड रोडवरील डी.ई. लाईट कॅफे हाऊसमध्ये बसलेले असल्याचे माहिती समजल्यानंतर या दोन तरुणांचे शनिवारी दुपारी दहा ते पंधरा जणांनी अपहरण करून त्यांना खांजापूर जवळील विठ्ठल कडा येथे नेत बेल्ट, काठी आणि लोखंडी रॉडने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील मोबाईल काढून घेत पुन्हा हिंदू मुलींच्या नादी लागाल तर ठार मारू अशी धमकी देण्यात आल्याचे म्हटले आहे. बेदम मारहाण करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांना रात्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मफाज मतीन खान पठाण आणि सचिनकुमार महंतो अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता. तसेच शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी सतर्कता दाखवत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. पोलिसांनी जखमींचे जबाब घेत मफाज मतीन खान पठाण याच्या फिर्यादीवरून दहा ते पंधरा जणांविरोधात अपहरण दरोडा आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी करण संपत गलांडे (वय 21, रा. अभंग मळा, संगमनेर), सोहम शेखर नेवासकर (वय 22, रा. गणेशनगर, संगमनेर), ओंकार राजेंद्र जोर्वेकर (वय 19, रा. अकोलेनाका, संगमनेर), विश्वास सिताराम मोहरीकर (वय 19, रा. नेहरू चौक, संगमनेर), संकेत बाबासाहेब सोनवणे (वय 21, रा. कुंभारआळा, संगमनेर), अजित अंकुश भरते (वय 24, रा. कुंभारआळा, संगमनेर), निशांत नंदू अरगडे (वय 21, रा. अरगडे गल्ली, संगमनेर) आणि विक्रम खडकसिंग लोहार (वय 22, रा. घुलेवाडी, संगमनेर) या आठ जणांना अटक केल्याची माहिती समोर येत असून पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,017
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.