Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजपच्या माजी महापौरांच्या नावाने पुण्यात व्यावसायिकाला मागितली ३ कोटीची खंडणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

भाजपच्या माजी महापौरांच्या नावाने पुण्यात व्यावसायिकाला मागितली ३ कोटीची खंडणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

"कॉल मी" ॲपच्या माध्यमातून भाजयुमोच्या कार्यक्रमासाठी मागितले होते पैसे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे :
“कॉल मी” या ॲपचा वापर करत पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरत व्यावसायिकाला तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. हा सगळा प्रकार बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप पिरगोंडा पाटील आणि शेखर गजानन ताकवणे असे खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर कॉल मी नावाचे ॲप डाऊनलोड केले होते ॲप डाऊनलोड करताना त्यात पुण्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला होता.

दोघांनी या ॲपचा वापर करून पुण्यातील पौंड रस्त्यावर कार्यालय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाईलवर संपर्क साधला. मुरलीधर मोहोळ यांच्या मावस भावाच्या नावाचा वापर करत त्यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी पैसे लागत आहेत त्यासाठी तीन कोटी रुपये द्या, पैसे न दिल्यास भविष्यात तुमच्या बांधकाम व्यवसायाला हानी पोहोचवू अशी धमकी देत खंडणी मागितली.

आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला. बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी संदीप पिरगोंडा पाटील आणि शेखर गजानन ताकवणे या दोन्ही आरोपी विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तात्काळ मोबाईल क्रमांकावरून शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 281
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.