Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात महिला क्रिकेटचा थरार सुरू… एकविरामुळे मुलींना क्रिकेटसाठी मोठे व्यासपीठ: आमदार बाळासाहेब थोरात
क्रिडा व कला

संगमनेरात महिला क्रिकेटचा थरार सुरू… एकविरामुळे मुलींना क्रिकेटसाठी मोठे व्यासपीठ: आमदार बाळासाहेब थोरात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
महिलांनी विज्ञान, कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन, समाजकारण, राजकारण, साहित्य यासह प्रत्येक क्षेत्रात केलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे. क्रिकेटमध्ये भारतीय मुलींची कामगिरी ही देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत असून कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एकविराच्यावतीने सुरू झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धेमधून मुलींसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनच्यावतीने महिला क्रिकेट सह बॅडमिंटन, रस्सीखेच व कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, अर्चना बालोडे, सुनंदाताई दिघे, सुषमा भालेराव, एकविराच्या डॉ. वृषाली साबळे, ज्योती थोरात, शर्मिला हांडे, तृष्णा औटी, अहिल्या ओहोळ, शिवानी वाघ, किरण गुंजाळ, पूजा गाडेकर, सुरभी आसोपा, सुरभी मोरे, मयुरी थोरात, गायत्री थोरात, पूजा थोरात, आदिती खोजे, अंबादास आडेप, संदीप लोहे, अभिजीत बेंद्रे, सत्यजित थोरात आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून फाउंडेशनच्या माध्यमातून मागील चार वर्षात महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिलांच्या विविध स्पर्धा आयोजनात यावर्षी प्रथमच भव्य महिला क्रिकेटचा थरार संगमनेरमध्ये होणार आहे. यामध्ये संगमनेर, अहमदनगरसह बाहेरून ४८ संघांचा सहभाग हा आनंददायी आहे.

महिलांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश आणि केलेली कामगिरी ही अभिमानास्पद असून क्रिकेटमध्ये ही मुलींना मोठी संधी आहे. या क्षेत्रामध्ये आता नव्याने करिअरच्या वाटा उपलब्ध झाल्या आहे. क्रिकेटमधून सांघिक भावनेसह अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते. आगामी काळात ही स्पर्धा नक्कीच उत्तर महाराष्ट्राचे मोठे केंद्र ठरेल.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत असून संगमनेर शहर हे सांस्कृतिक व वैभवशाली शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. एकविराच्या महिलांच्या क्रिकेट सामन्यांमधून महिला व विद्यार्थिनींनी घेतलेला मोठा उत्स्फूर्त सहभाग हा अत्यंत आनंददायी आहे. ही स्पर्धा राज्यभरातील मुलींसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण होईल. प्रास्ताविक डॉ. वृषाली साबळे यांनी तर ज्योती थोरात यांनी आभार मानले.

क्रिकेटमध्ये 48 संघांचा सहभाग

अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच महिला क्रिकेटच्या स्पर्धा होत असून संगमनेर तालुक्यासह अहमदनगर, नाशिक, पुणे इथूनही विविध क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. या सर्व संघांना टी-शर्ट, कॅप व कीट देण्यात आली असून अत्यंत अत्याधुनिक सुविधा, प्रेक्षकांसाठी गॅलरी, हिरवे मैदान आणि थेट लाईव्ह प्रक्षेपण यामुळे ही स्पर्धा रंगतदार ठरणार असून षटकार, चौकारांच्या वेळी ढोल ताशांच्या गजराने मैदान दुमदुमून जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 527
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.