Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रदीर्घ कालखंडानंतर संगमनेर पोलिसांनी दुचाकी चोरांकडून मिळविल्या तब्बल ५१ दुचाकी; पोलीस अधीक्षक राकेश ओलांनी संगमनेरमध्ये येऊन पोलिसांच्या कामगिरीचे केले कौतुक
गुन्हेगारी

प्रदीर्घ कालखंडानंतर संगमनेर पोलिसांनी दुचाकी चोरांकडून मिळविल्या तब्बल ५१ दुचाकी; पोलीस अधीक्षक राकेश ओलांनी संगमनेरमध्ये येऊन पोलिसांच्या कामगिरीचे केले कौतुक

संगमनेरसह राजुर, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, नेवासा, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सिन्नर, एमआयडीसी, वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे आणले उघडकीस; पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर :
संगमनेर शहर व परिसरातून दररोज दुचाकीची चोरी सुरू होती. या दुचाकी चोरांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. पोलीस उपाधीक्षक आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघा आरोपींकडून तब्बल २६ लाख रुपये किमतीच्या चोरीच्या ५१ मोटर सायकल हस्तगत करत आरोपींना ताब्यात घेतले. प्रदीर्घ कालखंडानंतर संगमनेरात झालेल्या या मोठ्या शोध मोहिमेचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बुधवारी संगमनेरमध्ये येऊन पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले.

संगमनेर शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, घारगाव पोलीस ठाणे, आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दररोज दुचाकी चोरी सुरू होती. ओला म्हणाले, दुचाकी चोरी हा पोलिसांसमोरील गंभीर विषय बनला होता. उपाधीक्षक संजय सातव, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दुचाकी चोरांच्या शोधासाठी पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे व प्रमोद गाडेकर, पोलीस नाईक फुरखान शेख यांचे पथक नियुक्त केले होते.

या पथकाने पोलीस उपाधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता होतं का नाही एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अक्षय सावन तामचीकर (वय १८ वर्ष) आणि सुरजित दिलीपसिंग तामचीकर (वय २२ वर्ष) दोघे रा. भाटनगर, घुलेवाडी, संगमनेर यांना ताब्यात घेतले असता त्यांनी संगमनेर परिसरातून दुचाकींची चोरी केल्याचे कबूल केले.

पोलीस पथकाने एक-एक करीत तब्बल ५१ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलीस चौकशी दरम्यान आरोपींनी संगमनेर शहर, शिर्डी, आश्वी, घारगाव, बोटा, राजुर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, वावी, नांदूर शिंगोटे, नाशिक, देवळाली, एमआयडीसी व सिन्नर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकींची चोरी केल्याचे कबूल केले आहे. आरोपींनी स्प्लेंडर मोटारसायकलींची मोठ्या प्रमाणात चोरी केल्याचे दिसून आले. तसेच चोरी केलेल्या दुचाकींची विक्री बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तसेच सेंधवा (मध्यप्रदेश) येथे केल्याचे सांगितले. पोलीस पथकाने सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २२, ओझर २, सायखेडा २, इगतपुरी ३, मंचर आणि चाकण ४, सातपूर नाशिक शहर १, संभाजीनगर कन्नड १, मालेगाव (वाशिम) २, सेंधवा मध्य प्रदेश येथून १ अशा विविध ठिकाणावरून ५१ दुचाकी विविध गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आल्या. यातील बहुतांशी दुचाकींचे मालक शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच अल्पवयीन बालकाला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक ओला यांच्या पत्रकार परिषदेवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे, आदीसह पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 435
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.