Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून संगमनेरात पर्यटन विकासासाठी ३ कोटी ३० लाखाचा निधी मंजूर
विकास

आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून संगमनेरात पर्यटन विकासासाठी ३ कोटी ३० लाखाचा निधी मंजूर

मामा-भाच्याच्या प्रयत्नातून परिसरातील मंदिरांचे होणार सुशोभीकरण
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 31, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थान परिसर सुशोभीकरण कामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

यासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मोठा निधी मिळवला असून तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी वस्तीसाठी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. आ. थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीवरून व पाठपुराव्यातून तालुक्यातील विविध गावांकरता प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२२-२३ अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे .यामधून ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी मिळाला आहे.

या निधी अंतर्गत तळेगाव दिघे येथील बिरोबा मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी २० लाख रुपये, साकुर येथील वीरभद्र देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये, धांदरफळ खुर्द येथील बिरोबा देवस्थान परिसर सुशोभीकरण १५ लाख रुपये, मिरपूर येथील आवजीनाथ देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये, पारेगाव खुर्द येथील मारुती मंदिर परिसर सुशोभीकरण १५ लाख रुपये, खांडगाव येथील कपालेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण २० लाख रुपये, वेल्हाळे येथील खंडोबा देवस्थान परिसर सुशोभीकरण १५ लाख रुपये, वडगाव लांडगा येथील काशाई माता मंदिर परिसर सुशोभीकरण १५ लाख रुपये, पेमगिरी येथील पेमादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण २० लाख रुपये, घारगाव येथील कळमजाई मंदिर परिसर सुशोभीकरण २५ लाख रुपये, आंबी खालसा येथील मुळेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण १५ लाख रुपये, अकलापुर दत्त देवस्थान सुशोभीकरणासाठी २० लाख रुपये, तर खळी येथील खंडोबा देवस्थान मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी ५० लाख असा एकूण तालुक्यात 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .

या निधी अंतर्गत देवस्थान मंदिर परिसरात पेव्हिंग्ज ब्लॉक, काँक्रिटीकरण, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था यांसह सुशोभीकरणाच्या विविध योजना राबवल्या जाणार आहेत. निधी मिळवून दिल्याबद्दल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांचे तळेगाव दिघे, साकुर, धांदरफळ खुर्द, मिरपुर, पारेगाव खुर्द , वेल्हाळे, वडगाव लांडगा, पेमगिरी, घारगाव, आंबी खालसा, अकलापूर, खळी येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 632
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

December 18, 2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

December 18, 2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

October 24, 2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.