Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मनोरुग्णास अन्न पाणी न देता दोरीने बांधून ठेवत त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या महिलेवर गुन्हा, संगमनेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार
गुन्हेगारी

मनोरुग्णास अन्न पाणी न देता दोरीने बांधून ठेवत त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या महिलेवर गुन्हा, संगमनेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 2, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
मनोरुग्णाचा झटका आल्याने दिवस-रात्र अन्न पाणी न देता त्याला दोरीने बांधून ठेवत मनोरुग्णाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या महिलेवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे हा प्रकार घडला असून सारंगधर गंगाधर पावसे (वय ६० वर्ष) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात त्यांच्या पत्नीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून माधुरी प्रभाकर गोडसे (रा. लहीत लिंगदेव, ता. अकोले, हल्ली मु. आठरके वस्ती, हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती अशी, फिर्यादी माहेरी गेल्यानंतर तिचा पती सारंगधर गंगाधर पावसे यांना २९ मार्चला सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान मनोरुग्णपणाचा झटका आला. त्यामुळे ते घरातील लोकांना त्रास देऊ लागल्याने आरोपी महिला माधुरी गोडसे हिने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मदतीने सारंगधर पावसे यांचे हातपाय दोरीने बांधून घरासमोरील पडवीत सिमेंटच्या पोलला त्यांना बांधून ठेवले होते.

३० मार्चला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सारंगधर पावसे यांचे हालचाल मंदावल्याने त्यांचे हातपाय सोडण्यात आले. मात्र भुकेल्या झालेल्या पावसे यांना जेवण न दिल्याने त्यांनी घरातील मिळेल ते पिऊन घेतले. आरोपीने फिर्यादीच्या पतीस 29 मार्च ते 30 मार्च दरम्यान जेवण न देता हातपाय बांधून फिर्यादीच्या पतीचा छळ करीत पावसे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांनी काहीतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद दिल्याने तालुका पोलिसांनी सीआरपीसी १७४ च्या चौकशीवरून आरोपी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रविवारी पहाटे दाखल केला आहे.

घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक संजय सातव, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक आय. ए. शेख आदींनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आय. ए. शेख हे करीत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 976
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

प्रवीण पुरो | मुंबई: राज्यात डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मोठ्या घोषणा…

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.