महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर
सहकारात दिशादर्शक आणि अनुकरणीय ठरलेल्या संगमनेरमधील सेवा सोसायट्यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उचललेल्या कर्जफेडीची परंपरा कायम ठेवली आहे. मार्च अखेर ८८ टक्के वसुली देत जिल्ह्यात संगमनेर प्रथम क्रमांकावर राहिला आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वसुलीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्याने सर्वाधिक वसुली दिल्याने तालुका प्रथम क्रमांकावर राहिला. याशिवाय तालुक्यातील ५७ सेवा सोसायट्यांनी जिल्हा बँकेला शंभर टक्के वसुली दिली असल्याची माहिती तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली.
सहकारातील दिवंगत नेते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सहकाराची पायामुळे भक्कम केल्याने तालुक्यात विकासाचे जाळे निर्माण झाले आहे. सहकारातून समृद्धी साधत या तालुक्यातील सहकाराने इतरांना दिशादर्शक काम केले आहे.
२७७ कोटी ७५ लाख रुपये कर्जापैकी संगमनेर तालुक्याने २४३ कोटी ०५ लाख रुपये इतका वसूल जिल्हा बँकेला दिला.

