Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणेचा चौथ्या बँकेचा घोटाळा समोर! महसूलमंत्र्यांच्या अधिपत्याखालील प्रवरा बँकेतही केली 38 लाखाची फसवणूक… 9 जणांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणेचा चौथ्या बँकेचा घोटाळा समोर! महसूलमंत्र्यांच्या अधिपत्याखालील प्रवरा बँकेतही केली 38 लाखाची फसवणूक… 9 जणांवर गुन्हा दाखल

संगमनेरात बँक घोटाळ्याची मालिका सुरूच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2023Updated:03/04/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आणि जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सोनेतारण घोटाळ्यानंतर आता सोने मूल्यांकनकार गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याचा प्रवरा सहकारी बँकेतील 38 लाख 44 हजार 422 रुपयांचा फसवणुकीचा घोटाळा समोर आला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शहाणे याच्यासह नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात बँकेचे संगमनेर शाखेचे व्यवस्थापक सुदाम किसन शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बँकेने नेमलेल्या अधिकृत मूल्यांकनकार जगदीश शहाणे याच्यामार्फत कर्जदाराने दिलेल्या सोन्याची शुद्धता तपासणी करून ते खरे किंवा खोटे याची खात्री केल्यावर सोन्याचे मूल्यांकनाचे तपासणी व ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेच्या नियमानुसार सोने तारण कर्ज वितरित करण्यात आले आहे.

बँकेने सोन्याच्या मूल्यांकनाचे काम करण्यासाठी गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. मालदाड रोड, संगमनेर) यांची नेमणूक केली होती. त्यामुळे बँकेत कर्जासाठी तारण ठेवलेले सोने खोटे निघाले तर त्याबाबत मूल्यांकनकार व सोनेतारण कर्जदार यांना जबाबदार धरण्यात येते.

संगमनेरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा संगमनेर, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक शाखा संगमनेर, जीएस महानगर को-ऑपरेटिव बँक शाखा संगमनेर या बँकांमध्ये झालेले सोनेतारण प्रकरणे खोटी निघाली असून या बँकांमध्ये जगदीश शहाणे हा अधिकृत सराफ असल्याने त्याच्या व कर्जदारांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बँकेने 40 सोनेतारण कर्जदारांच्या दागिन्यांची तपासणी करण्याचे ठरविले होते. तपासणीअंती आठ सोनेतारण कर्जदारांनी बँकेकडे गहाण ठेवलेले सोने खोटे असल्याचे आढळून आले.

त्यामुळे शाखा अधिकारी सुदाम शेजवळ यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांनी फेब्रुवारी 2022 पासून कर्ज घेतेवेळी तारण म्हणून बँकेत खोटे सोने ठेवून तसेच खोटे सोने खरे असल्याचे मूल्यांकन प्रमाणपत्र शहाणे यांनी सोबतच्या आठ कर्जदार आरोपींसह बँकेला देऊन बँकेचा विश्वास संपादन करत 38 लाख 44 हजार 422 रुपयांची फसवणूक केली. अशा आशयाची फिर्याद दिल्याने शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करीत आहेत.

यांच्या विरोधात झाला गुन्हा दाखल… (कंसात कर्जाची रक्कम)
1) भानुदास यशवंत ढगे रा. पिंपळगाव खांड, ता. अकोले (1 लाख पंचावन्न हजार रुपये) व (1 लाख 90 हजार रुपये)
2) गोरक्ष राधाकृष्ण गाडेकर रा. मनोली, ता. संगमनेर (2 लाख रुपये)
3) सुधीर रावसाहेब घुगे रा. घुलेवाडी, ता. संगमनेर (1 लाख 44 हजार) व (1 लाख 90 हजार)
4) मारुती अण्णासाहेब मंडलिक रा. रायतेवाडी फाटा, संगमनेर खुर्द (दोन लाख रुपये)
5) शरद मारुती पर्बत रा. ढोलेवाडी राजापूर, ता. संगमनेर (1 लाख 91 हजार), (1 लाख 84 हजार), (1 लाख 82 हजार रुपये), (2 लाख रुपये), (1 लाख 80 हजार रुपये) व (1 लाख 92 हजार रुपये)
6) राहुल ज्ञानेश्वर गुरुकुले रा. पाटील मळा, संगमनेर खुर्द (दोन लाख रुपये) व (दोन लाख रुपये)
7) सारिका सतीश पोटे रा. संगम निर्माण संस्था, घुलेवाडी, ता. संगमनेर (4 लाख रुपये)
8) सुशील सुरेश रोहम रा. निमगाव टेंभी, ता. संगमनेर (दोन लाख रुपये)
9) सुवर्ण मूल्यांकनकार जगदीश लक्ष्मण शहाणे

○○○○

नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळात गुन्ह्याची माहिती दडविण्याचे काम सुरू झाले असल्याचे दिसते. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये एक एप्रिल ला गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या गुन्ह्यासह अनेक गुन्ह्यांची माहिती अपवादात्मक पत्रकार वगळता अन्य पत्रकारांना नाकारले जात असल्याचे दिसून आले आहे शहर पोलिसांचा काही ठराविक पत्रकारांना माहिती देण्याचा तर अन्य पत्रकारांना नाकारण्याचा नेमका उद्देश समजू शकलेला नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,184
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग…

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.