Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी तब्बल 109 उमेदवारी अर्ज; थोरात-विखे समर्थकांसह भाजप शिवसेनेचेही उमेदवार मैदानात, बघा कोण आहेत इच्छुक उमेदवार…
शेती व सहकार

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी तब्बल 109 उमेदवारी अर्ज; थोरात-विखे समर्थकांसह भाजप शिवसेनेचेही उमेदवार मैदानात, बघा कोण आहेत इच्छुक उमेदवार…

उन्हाबरोबरच बाजार समितीची निवडणूक तापणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/04/2023No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज | अनंत पांगारकर
दीर्घकाळ मुदतवाढ मिळालेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसा अखेर तब्बल 109 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत प्रथमताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली थोरात विरोधक निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत.

28 एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अखेरचा दिवस होता. राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्याचे दिसते. त्यामुळे विखे समर्थक उमेदवारांचे अर्ज मोठ्या संख्येने आले आहेत. विशेष म्हणजे विखे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे इतर वेळी निवडणुकीपासून दूर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण देखील झाल्याचे दिसते. याशिवाय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आजी-माजी तालुकाप्रमुखांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसते. या दोघांपैकी एका पदाधिकाऱ्याला देखील विखे यांचे पाठबळ आहे.

आत्तापर्यंत दाखल झालेले उमेदवारी अर्ज खालील प्रमाणे:

कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघ शेतकरी प्रतिनिधी मतदार संघातून 43 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये बाजार समितीचे विद्यमान सभापती शंकर हनुमंता खेमनर, भाऊराव रामराव देशमुख, यशवंत कारभारी शेळके, रंगनाथ मच्छिंद्र फटांगरे, संजय रामभाऊ फड, संभाजी दामू गुंजाळ, कैलास बाळासाहेब पानसरे, प्रभाकर कचरू गोपाळे, भास्कर पाटीलबा गोपाळे, एकनाथ दादा गोपाळे, मनीष सूर्यभान गोपाळे, सुरेश रामचंद्र कान्होरे, गीताराम दशरथ गायकवाड, विनायक बाजीराव काळे, दिनकर जयराम गडाख, सतीश विश्वनाथ खताळ, अनिल शिवाजी घुगे, बाळासाहेब लहाणू शेटे, गोविंद गमाजी कांदळकर, डॉ. अशोक वामनराव इथापे, शिवाजी बाळासाहेब गुंजाळ, भीमराज नामदेव चत्तर, प्रकाश गंगाराम भालके, योगेश मधुकर देशमुख, रवींद्र बाबुराव देशमुख, ॲड. पोपटराव गंगाधर वाणी, विकास शांताराम गायकवाड, पोपट बाबुराव आहेर, संजय दत्तात्रय पावसे, कचरू भाऊपाटील वारुक्षे, कचरू बाळा फड, संजय सदाशिव कवडे, सोमनाथ रामचंद्र कानवडे, काशिनाथ रभाजी पावसे, सोपान काशिनाथ दिघे, ॲड. श्रीराम अरविंद गणपुले, सोमनाथ कारभारी नेहे, विठ्ठल रघुनाथ पानसरे, धोंडीराम तुकाराम राहणे, सोपान सिताराम जोंधळे, पोपट आप्पासाहेब भोसले, रमेश नामदेव शिंगोटे, विजय विठ्ठल सातपुते यांचा समावेश आहे.

सोसायटी मतदार संघ वि.जा.भ.ज. मतदार संघातून सात जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये शंकरराव हनुमंता खेमनर, अनिल शिवाजी घुगे, संदीप भाऊसाहेब घुगे, अनिल शिवराम खेमनर, संजय रामभाऊ फड, बुवाजी भागा खेमनर व श्रीकांत त्रिंबक गोमासे यांचा समावेश आहे.

इतर मागासवर्गीय मतदारसंघातून चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यात सुधाकर पुंजाजी ताजने, आशा संदीप क्षीरसागर, अरुण भागवत कुळधरण, शरद ज्ञानदेव गोर्डे यांचा समावेश आहे.

महिला राखीव मतदार संघातून रुख्मिणी शिवाजी साकुरे, दिपाली भाऊसाहेब वर्पे, अंजनाबाई पुंजा दिघे रोहिणी किशोर निघुते शशिकला शिवाजी पवार व इंदुबाई मधुकर रुपवते या सहा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

ग्रामपंचायत मतदार संघातून शंकरराव हनुमंता खेमनर, रामकृष्ण नाथा पांडे, दत्तात्रय केशव गुंजाळ, अरुण तुळशीराम वाघ, सखाहरी बबन शरमाळे, सतीश पुंजा कानवडे, शिवाजी पांडुरंग वलवे, गजानन कोंडाजी खाडे, रामकृष्ण निवृत्ती गाडेकर, संदीप भास्करराव देशमुख, जनार्दन म्हातारबा आहेर, सोमनाथ पुंजा गोडसे, नानासाहेब सुखदेव उंबरकर, संतोष विश्वनाथ घुगे, प्रमोद सतीश बोंद्रे, निशा अशोक काळे व संतु गंगाधर कुटे या सतरा जणांचा समावेश आहे.

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून निलेश बबन कडलग, निलेश बबन कडलग, संजय दत्तात्रय पावसे व दत्तात्रय श्रावण चांदे या चार जणांनी अर्ज दाखल केले.

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून शैला मंजाबापू साळवे, संजय दादा खरात, दादा कोंडाजी गायकवाड, महादू जानकू गोंदे, शिवाजी मारुती गवारे, आत्माराम संतु जगताप, महेश अण्णासाहेब उदमले आणि विकास शांताराम गायकवाड या आठ जणांचे अर्ज दाखल झाले.

व्यापारी मतदारसंघातून 15 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये लाला अहमद बेपारी, शौकत सरदार बागवान, उबेद रशीद शेख, मनसुख शंकर भंडारी, अजिज गुलाम हुसेन शेख, भारत विश्वनाथ मुंगसे, अजिजखा करीमखान पठाण, निसार गुलाब शेख, समीर निसार शेख, योगेश मधुकर देशमुख, नामदेव मनाजी सरोदे, सुभाष शंकर गुंजाळ, खलील नबाब शेख, रफिक पापा (बेपारी) शेख व नबी पापा शेख.

हमाल मापारी मतदारसंघातून सचिन बाळकृष्ण कर्पे, सचिन बाळकृष्ण कर्पे, विकास ज्ञानेश्वर लहामगे, महेंद्र रखमा गुंजाळ व सोमनाथ तुकाराम दिघे यांचे पाच अर्ज दाखल झाले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 968
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.