Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हॉटेल काश्मीरशेजारी दोन किराणा दुकान फोडत चोरट्यांनी सिगारेट, विलायची, रोकड रकमेसह पावणेदोन लाखाचा मुद्देमाल केला लंपास
गुन्हेगारी

हॉटेल काश्मीरशेजारी दोन किराणा दुकान फोडत चोरट्यांनी सिगारेट, विलायची, रोकड रकमेसह पावणेदोन लाखाचा मुद्देमाल केला लंपास

सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असलेल्या आणि गजबजलेल्या परिसरात झाली चोरी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 5, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
रात्रंदिवस माणसांची वर्दळ असलेल्या बस स्थानकासमोरील काश्मीर हॉटेललगत अज्ञात चोरट्याने दोन किराणा दुकान फोडत दुकानातील रोकड रकमेसह सिगारेट, विलायची असा पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असलेला परिसर आणि सातत्याने 24 तास माणसांची वर्दळ असलेल्या ठिकाणी झालेली ही चोरी शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात तुषार अशोक राठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातून जाणाऱ्या नासिक-पुणे महामार्गावर बस स्थानक आणि हॉटेल काश्मीर या गजबजलेल्या परिसरात काश्मीर हॉटेल लगत राठी यांच्या मालकीची किराणा दुकाने आहेत. फिर्यादी तुषार राठी हे सोमवारी रात्री दहा वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. मंगळवारी सकाळी सात वाजता दुकान उघडण्यास नेहमीप्रमाणे आले असता त्यांना, किराणा दुकानातील सिगारेटचा माल दिसला नाही तसेच गल्ल्यातील रोख रक्कमही दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी वडील अशोक राठी यांना दुकानातील सिगारेट आणि रोख रकमेबद्दल विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

राठी या भावंडांचे हॉटेल काश्मीर शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये पल्लवी किराणा आणि गणेश किराणा दुकान आहे. शेजारी शेजारी असलेल्या दुकानच्या शेडची एक खिडकी नेहमी उघडी असते. त्यामुळे ही खिडकी उचकटून अज्ञात चोरट्याने दोघांच्या दुकानातील सुमारे 92 हजार रुपयांची सिगारेट, 36 हजार रुपयांची विलायची आणि दुकानच्या गल्ल्यातील 42 हजार 500 रुपयांची रोकड असा सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी सकाळी सात वाजे दरम्यान चोरीची ही घटना घडली असून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या चोरीचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 726
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

प्रवीण पुरो | मुंबई: राज्यात डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मोठ्या घोषणा…

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.