Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकाच दिवसात पंधरा शाखा सुरू करणाऱ्या शहर प्रमुखांना संपर्कप्रमुखांची शाबासकीची थाप! नाम फलकाच्या लोखंडी पाट्या आणि त्यावरील शिवसेनेचा वाघ ठरला चर्चेचा…
विश्लेषण

एकाच दिवसात पंधरा शाखा सुरू करणाऱ्या शहर प्रमुखांना संपर्कप्रमुखांची शाबासकीची थाप! नाम फलकाच्या लोखंडी पाट्या आणि त्यावरील शिवसेनेचा वाघ ठरला चर्चेचा…

संगमनेरात नव्याने पक्ष बांधणीला वेग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/04/2023Updated:05/04/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ○ अनंत पांगारकर
शिवसेनेतील सर्वात मोठ्या फुटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या अमर कतारी यांच्यावर सातव्यांदा शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविले गेली. त्यानंतर कतारी यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांचा “आता जिंकेपर्यंत लढायचं” हा आदेश मानत शहरात एकाच दिवशी सर्व प्रभागात पंधरा शिवसेनेच्या शाखा सुरू केल्या. या शाखांची उद्घाटन करताना संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शहरप्रमुखांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

संगमनेर शहरातील सर्वच्या सर्व पंधरा प्रभागामध्ये बुधवारी (५ एप्रिल) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप, विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे व जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख आदींच्या हस्ते या शाखांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोपरगावचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, नागपूर ग्रामीणचे संपर्कप्रमुख नरेश माळवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांसह स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली, परिणामी राज्यातील शिवसेनेचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार देखील पडले. एकापाठोपाठ एक तब्बल चाळीसहून अधिक आमदार, खासदार पक्षातून बाहेर पडल्यानंतर राज्यभरात शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने संघटनात्मक बांधणी हाती घेतली. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील ठाकरेंची साथ सोडली. लोखंडे यांनी पक्षासोबत गद्दारी केल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे या मतदारसंघात पक्ष बांधणीची जबाबदारी संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर येऊन पडली. घोलप यांनी देखील नव्या जुन्यांचा मेळ साधित धाडसी कणखर निर्णय घेत पक्षाची नव्याने पुनर्रचना केली. शहरातील दोन शहर प्रमुखांपैकी कतारी यांच्यावरच पूर्ण शहराची जबाबदारी सोपविण्यात आली.

नव्याने जबाबदारी शिरावर घेतलेल्या कतारी यांनी वरिष्ठांचे आदेश पाळत पक्ष बांधणीसाठी नव्याने प्रयत्न सुरू केले. संघटनात्मक बांधणी करतानाच त्यांनी नव्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करण्याचा संकल्प केला. पक्ष संघटन वाढवितांना त्यांनी शहरातील सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये शिवसेना शाखा सुरू करण्याचा वरिष्ठांना दिलेला शब्द पूर्णत्वास नेला. बुधवारी सर्वच्या सर्व शाखांची उद्घाटने संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

रंगारगल्ली, माळीवाडा, संजय गांधी नगर, मोमीनपुरा, इंदिरानगर, जनतानगर, छत्रपती शिवाजीनगर, मालदाड रोड, विद्यानगर, अलकानगर, मदिनानगर, तेलीखुंट, कुंभारआळा, नेहरू चौक, साईनगर व घोडेकर मळा परिसरात ह्या पंधरा शाखांची उद्घाटने संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप, विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे व जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आली. शाखानिहाय लोखंडी नामफलकाच्या पाट्या, त्यावरील वाघ चर्चेचा विषय ठरले. संघटनात्मक बांधणीचा शब्द पूर्णत्वास नेल्याबद्दल संपर्कप्रमुखांनी शहरप्रमुख कतारी यांची पाठ थोपटत कौतुक केले. संकटकाळात पक्ष नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत दिलेल्या शब्द पाळल्याबद्दल सर्वच पदाधिकाऱ्यांनी कतारींचे कौतुक केले. शिवसैनिक आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण हे काम करू शकल्याचे अमर कतारी यांनी म्हटले आहे.

यावेळी शिवसेना संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठारभाग प्रमुख संजय फड, शहर समन्वयक असिफ तांबोळी, शहर संघटक दीपक साळुंखे, उपशहर प्रमुख दीपक वन्नम, वेणूगोपाल लाहोटी व इम्तियाज शेख, पठारभाग युवासेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, लक्ष्मण सोनर, विजय सातपुते, बाळासाहेब कवडे, शरद कवडे, सदाशिव हासे, महिला आघाडीच्या शितल हासे, आशा केदारी, संगीता गायकवाड, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, दिव्यांग सेनेचे प्रमुख जालिंदर लहामगे, सुदर्शन इटप, अमोल डुकरे, सचिन साळवे, परवेज शेख, योगेश बिचकर, संभव लोढा, अशोक बडे, अक्षय बिल्लाडे, गोविंद नागरे, विभागप्रमुख प्रवीण चव्हाण, विशाल बाप्ते, प्रशांत खजुरे, विजय भागवत, माधव फुलमाळी, जयदेव यादव, प्रशांत कपूर, प्रतीक गाडेकर, ओंकार सस्कर, अल्ताफ शेख, सुशांत भावसार, लिंगमूर्ती चिंता, वैभव अभंग, समीर तांबोळी, शाखाप्रमुख जितेंद्र दर्वे, नितीन अनाप, प्रकाश चोथवे, मुस्लिम मावळा अजित मोमीन, संजय भागवत, तिलक गांधी, अनिल खुळे, ज्ञानेश्वर दुस्सा, ब्रह्मा खिडके, मोहसीन शेख, अक्षय गाडे, आनंद नागरे, रहिम बेग, कुमार कुडके, गौरव काळे, सलमान शेख, आयुब शेख, हर्षद सय्यद, ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद कुलट, संजय कबाडे, रोहित नि-हाळी, अक्षय गुंजाळ, दानिश खान, नितीन हासे, फैसल सय्यद, फरोज कतारी, मुकेश काठे, सागर शेंडे, विक्रम कतारी, त्रिलोक कतारी, आलेख कुदळ, केवल कतारी, प्रसन्न गोरे आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 617
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

रविवार विशेष लेख — अर्बन नक्षल ते दिमागी नक्षल

23/08/2026

रविवार विशेष लेख — शास्त्रज्ञांविरोधी कट हनीट्रॅपिंगचा

16/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात अहिल्यानगर स्थानिक…

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.