Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गतवर्षीच्या वादानंतर पोलीस प्रशासनाचा मानाचा ध्वज पोलीस निरीक्षक भगवान मथुरेंनी वाजत गाजत फडकविला रथावर
इतिहास

गतवर्षीच्या वादानंतर पोलीस प्रशासनाचा मानाचा ध्वज पोलीस निरीक्षक भगवान मथुरेंनी वाजत गाजत फडकविला रथावर

हनुमान जयंती रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/04/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज □ अनंत पांगारकर
ऐतिहासिक असलेल्या संगमनेरच्या हनुमान रथोत्सव मिरवणूक गेल्या वर्षी एका वेगळ्याच वादात सापडल्यानंतर यावर्षी मात्र पोलीस प्रशासनाचा मानाचा ध्वज वाजत गाजत आणत तो रथावर फडकाविण्याचा मान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कायम ठेवला. गतवर्षी निर्माण झालेल्या वादामुळे हा ध्वज आणण्याचा मान पोलीस निरीक्षकांऐवजी इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस उपनिरीक्षकाला मिळाला होता.

संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सव आणि त्यानिमित्ताने निघणाऱ्या रथ मिरवणुकीला एक वेगळी परंपरा लाभली आहे. कोरोना संकटानंतर गतवर्षी संगमनेरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार भाजपच्या नेत्या चित्रा वाघ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे अकोल्याच्या तत्कालीन नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी आदी महिला नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.

एकीकडे ऐतिहासिक ठरत असलेल्या या मिरवणुकीला दुसरीकडे मात्र पोलीस आणि नागरिकांच्या वादामुळे गालबोट लागले होते. त्यामुळे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने शहरातून काढण्यात येणार्‍या रथ यात्रेत पोलीस प्रशासनाकडून येणारा मानाचा ध्वज गोवंश कत्तलीच्या पैशात हात माखलेल्या अधिकार्‍यांच्या हस्ते पाठवू नये, अशी भूमिका भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी मांडली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपामुळे ते चांगलेच वादात सापडले होते. देशमुख आणि तत्कालीन अधिकाऱ्यांमुळे निर्माण झालेला हा वाद राज्यभर गाजला.

देशमुख यांच्या हस्ते पोलीस प्रशासनाचा ध्वज आणता येणार नसल्याने वरीष्ठ अधिकार्‍यांच्या सांगण्यावरुन निरीक्षक देशमुख, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने आदी स्थानिक पोलीस अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. मात्र पोलीस प्रशासनाकडून येणारा ध्वज हा संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले या महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या खांद्यावर कर्मचार्‍यांसह वाजत गाजत आणला. या घटनेने प्रथमच एका महिला पोलीस अधिकार्‍यास ध्वज आणण्याचा मान मिळाला.

गेल्या वर्षी पोलीस निरीक्षकांऐवजी उपनिरीक्षक निकिता महाले यांना मिळाला होता मान

यावर्षी मात्र कोणत्याही वादाविना हा ध्वज संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह शहरातून वाजत गाजत मारुती मंदिरात आणला. त्यामुळे गतवर्षीचा अपवाद वगळता 94 व्या वर्षी हा मान पोलीस निरीक्षकांना मिळाला. मथुरे यांच्या हस्ते हा ध्वज रथावर चढविण्यात आला. त्यामुळे संगमनेरच्या ऐतिहासिक रथोत्सवाचे साक्षीदार होण्याचा मान देखील पोलीस प्रशासनातील अधिकारी म्हणून त्यांना मिळाला.

● काय आहे परंपरा
पूर्वीपासून संगमनेर मध्ये हनुमान जयंतीला रथाची मिरवणूक निघत असते. मात्र 1927 ते 1929 या काळात तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरून वाद उपस्थित करत ही मिरवणूक रोखून धरल्याचे प्रकार घडले होते. 1929 मध्ये तत्कालीन ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांना न जुमानता संगमनेरातील महिला रणरागिणींनी हा रथ ओढत नेल्याचा इतिहास आहे. त्या वेळेपासून रथ होण्याचा मान महिलांना मिळाला. तसेच तेव्हापासून पोलीस प्रशासनाच्यावतीने मानाचा ध्वज देखील या रथावर लावला जाऊ लागला.

○  या पोलीस अधिकाऱ्यांची होती उपस्थिती
पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, उपनिरीक्षक बारकू जाने, उपनिरीक्षक श्रीमती फरहाजान पटेल, उपनिरीक्षक शालोमन सातपुते, उपनिरीक्षक राजेश गायकवाड, उपनिरीक्षक बाळासाहेब यादव आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 797
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

01/07/2026

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

14/04/2026

गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन

17/02/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात अहिल्यानगर स्थानिक…

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.