Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गळा दाबून संगमनेरात महिला वकिलाला जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा
गुन्हेगारी

गळा दाबून संगमनेरात महिला वकिलाला जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
अनैतिक संबंधाचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला वकिलाला गळा दाबून, मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी गावामध्ये मंगळवारी अहिंसेचा संदेश देणाऱ्या महावीर जयंती दिनी घडली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित वकील महिला जिल्ह्यातील एका न्यायालयात वकिली करत आहे. या महिलेच्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, ही बाब त्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी या संदर्भात पतीला समजावून सांगण्यासाठी आपल्या सासूला सांगितले होते. महावीर जयंतीदिनी 4 एप्रिल ला संबंधित महिला आपल्या घरी असताना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या महिलेच्या सासूने तिच्या पतीस आणि महिलेचा पती असलेल्या मुलास घरी बोलावून घेतले.

नवरा घरी येतात त्याने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घराचे दरवाजे बंद करत नवरा, सासरा आणि सासूने त्यानंतर महिलेला बेडरूममध्ये ओढून नेत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी नवऱ्याने पत्नीला खाली पाडून तिच्या छातीवर बसत तिचा गळा दोन्ही हाताने दाबला. यावेळी महिलेचा श्वास गुदमरला गेला. याच दरम्यान सासू-सासरे देखील तिला मारहाण करत होते. मारहाण करताना ते नवऱ्याला माझा गळा दाबून मारून टाकण्यास सांगत होते. सासरा महिलेच्या पायाला धरून घरामध्ये जोरात इकडे-तिकडे ओढत होता.

गळा दाबून मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही महिला बेशुद्ध पडली. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यावर या महिलेने गुपचूप कुणाला न सांगता घराबाहेर येत एका राजकीय पक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्याला दुसऱ्याच्या मोबाईल फोनवरून फोन करत आपबीती कथन केली. कार्यकर्त्याने घरातील लोकांना विश्वासात घेत या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मारहाणीमध्ये संबंधित वकील महिलेच्या चेहऱ्याला पोटाला छातीला मार लागला आहे.

रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी महिलेचा पती सासू आणि सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,077
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग…

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.