Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्यासाठी मागितले ४०,०००/- रुपये; खासगी एजंटसह लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला
गुन्हेगारी

स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्यासाठी मागितले ४०,०००/- रुपये; खासगी एजंटसह लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला

मध्यस्थ एजंट धास्तावले; अनेकांचे फोन झाले नॉट रिचेबल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल चाळीस हजाराची लाच मागणारा तलाठी आणि त्या तलाठ्यासाठी छत्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासगी एजंट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. धनराज नरसिंग राठोड (वय ४० वर्ष) असे लाचखोर तलाठ्याचे तर योगेश विठ्ठल काशीद (वय ३३ रा. घुलेवाडी फाटा, ता. संगमनेर) असे लाचखोर खासगी एजंटचे नाव आहे.

संगमनेर मध्ये शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळापुर येथील बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तसेच त्यावर वडील व इतर ११ जणांची नावे असलेला हा उतारा तक्रारदार व्यक्तीला हवा होता. त्यासाठी चिखली येथील लाचखोर तलाठी धनराज नरसिंग राठोड (रा. इंदिरानगर, गल्ली क्रमांक १, संगमनेर, जि. अहमदनगर) याने त्यासाठी तक्रारदाराकडे चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती हा व्यवहार छत्तीस हजार हजार रुपयात निश्चित झाला होता.

यासंदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. पैसे देण्याचे निश्चित झाल्यानंतर एसीबीने संगमनेर येथील टायपिंग सह्याद्री मल्टी सर्विसेसच्या योगेश काशीद याच्याकडे देण्यास सांगितले. लाचखोर तलाठी राठोड याच्या सांगण्यावरून खाजगी एजंट काशीद लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. विशेष म्हणजे या कारवाई वेळी याठिकाणी सेवानिवृत्तीला अवघे काही तास शिल्लक असलेला एक मंडलाधिकारी देखील उपस्थित होता. पथकाने त्यालाही ताब्यात घेतले होते मात्र चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. तसेच पोलिसांच्या मदतीने लाचखोर तलाठी राठोड याला देखील पकडण्यात आले.

पकडलेल्या सर्वांना शासकीय विश्रामगृहामध्ये आणण्यात आले होते तेथे एसीबीने आपल्या कारवाईचे सोपस्कार पार पाडल्यानंतर तलाठी राठोड आणि खाजगी मध्यस्थ एजंट काशीद यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने सध्या तहसीलदारांविना सुरू असलेल्या संगमनेरच्या महसूल खात्यात खळबळ उडाली असून मध्यस्थ एजंटांची मोठी पळापळ झाल्याचे दिसत आहे. अनेक मध्यस्थ, एजंट नॉट रिचेबल झाले.
———-
▶️ सापळा अधिकारी
श्रीमती गायत्री म. जाधव, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो. न. 7588516042
▶️ सापळा पथक
पोलीस हवालदार सचिन गोसावी.
पोलीस नाईक अजय गरुड.
चालक पोलीस हवालदार विनोद पवार.
▶️ मार्गदर्शक
श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक, मो.न. 9371957391
श्री.नारायण न्याहाळदे
अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
श्री. नरेंद्र पवार
वाचक पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक. मो. न. 9822627288.
—————————
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
टोल फ्री क्रमांक 1064

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,118
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.