Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पवित्र रमजान ईदच्या सणाला गालबोट; पूर्वसंध्येला झाली हाणामारी चौघे जखमी… नगरसेवकासह 28 जणांविरोधात विनयभंग, दंगल, शस्त्राचा वापर आदी कलमान्वये गुन्हा दाखल
गुन्हेगारी

पवित्र रमजान ईदच्या सणाला गालबोट; पूर्वसंध्येला झाली हाणामारी चौघे जखमी… नगरसेवकासह 28 जणांविरोधात विनयभंग, दंगल, शस्त्राचा वापर आदी कलमान्वये गुन्हा दाखल

शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/04/2023Updated:22/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील दोन गटात झालेल्या दंगलीमुळे ईदच्या सणाला संगमनेरमध्ये गालबोट लागले आहे. शहर पोलिसांनी नगरसेवकासह निष्पन्न झालेल्या आठ जणांसह 28 जणांविरोधात दंगल, विनयभंग आणि शस्त्राचा वापर आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एकास अटक केल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटातील वादाची परिणती प्राणघातक हल्ल्यात झाली.

शहरातील नाईकवाडपुरा भागात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. हाणामारीमध्ये तलवार, चाकू, हॉकी स्टिकचा वापर करण्यात आल्याने चार जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रात्री नाईकवाडपुरा भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी रमजान ईदच्या पवित्र सणाला मात्र या प्रकारामुळे गालबोट लागले आहे.

शहर पोलीस ठाण्यात पहाटे जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित महिला शुक्रवारी सायंकाळी बाजारातून आपल्या घराकडे जात असताना आरोपी अहमद अब्दुल वाहिद शेख याने त्यांना रस्त्यात आडवत त्यांचा हात धरत लज्यास्पद वर्तन केले. त्यामुळे पीडित महिलेचा मुलगा मध्ये आला असता त्याला अहमद शेख याच्यासह नगरसेवक रिजवान शेख, जयेश अहमद शेख, रेहान शेख, नवाज शेख यांनी मारहाण केली. आरोपीपैकी एकाने हॉकी स्टिकने संबंधित महिलेच्या मुलावर हल्ला चढवला त्यामुळे मध्यस्थीसाठी मध्ये पडलेल्या हमजा मुसा सय्यद, कैफ परवेज शेख व अमन अखिल शेख यांना देखील जमावाने मारहाण केली. यादरम्यान हमजा सय्यद याच्यावर तलवारीने वार करण्यात आला मात्र ते बचावले.

दरम्यान 15 ते 20 जणांनी हमजा सय्यद याला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी पीडित महिलेच्या मुलासह मध्यस्थीसाठी मध्ये पडलेले अन्य तिघेजण हाणामारीत जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,840
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.