Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वेगळ वळण… त्या शेतकऱ्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर घातपाताने! खुनाच्या शक्यतेने पोलीस तपास सुरू
गुन्हेगारी

वेगळ वळण… त्या शेतकऱ्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर घातपाताने! खुनाच्या शक्यतेने पोलीस तपास सुरू

संगमनेरच्या घारगावजवळ घडली होती घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/04/2023Updated:24/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
वडदरा (बोटा) येथे शनिवारी (22 एप्रिल) रात्री उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय 62 वर्ष) यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यामुळे घरात घुसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते मात्र कुऱ्हाडे यांच्या शवाविच्छेदन अहवालानंतर त्यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण मिळाला असून कुऱ्हाडे यांचा खून करण्यात आला असल्याच्या शक्यतेने पोलीस तपास करण्यात येत आहे.

नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव या महत्त्वाच्या गावालगत असलेल्या बोटा गावांतर्गत येणाऱ्या वडदरा येथे शनिवारी रात्री वृद्ध आई समवेत घरात असलेल्या उत्तम बाळाजी कुऱ्हाडे यांच्यावर घरात घुसलेल्या बिबट्याने हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पुढे आली होती. मात्र घटनास्थळी आलेल्या वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बिबट्याने हल्ला केल्या संदर्भात संशयास्पद काहीही आढळून आले नाही. कुऱ्हाडे अविवाहित असून ते आपल्या वृद्ध आई समवेत घरात राहत होते. घरातील चुली जवळच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

वृद्ध आईने केलेला आरडाओरडीमुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत याची माहिती वनविभाग आणि घारगाव पोलिसांना दिली होती. घटनास्थळी आलेल्या वनविभाग आणि घारगाव पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात पाठविला होता. वैद्यकीय तपासणीअंती कुऱ्हाडे यांचा मृत्यू त्यांच्या पाठीवर धारदार हत्याराने करण्यात आलेल्या जखमेमुळे हृदय आणि फुफ्फुसाला मार लागल्याने झाला असल्याचा निष्कर्ष समोर आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला आहे.

त्यामुळे रविवारी सकाळीच घटनास्थळी नगर येथून श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. कुऱ्हाडे यांचा खून करण्यात आल्याची शक्यता लक्षात घेत घारगाव पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे कुऱ्हाडे यांचा परिसरात कोणाशी वाद होता का? कोणी आणि कोणत्या कारणामुळे त्यांची हत्या केली या बाबी पोलीस तपासामध्ये समोर येणार आहेत. दरम्यान कुऱ्हाडे यांचा शवाविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी तपासला दिशा मिळेल तसेच त्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 623
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.