Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण; अपहरण व पोक्सोअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण; अपहरण व पोक्सोअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल

संगमनेर शहरातील प्रकार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/04/2023Updated:24/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
चौदा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर केलेले मेसेज अठरा वर्षे वयाच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोलिसांनी अपहरणासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

अमन सलीम मोमीन असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते. अमन मोमीन याने पीडित तरुणीच्या वडिलांच्या मोबाईलवर असलेल्या इंस्टाग्रामवर मेसेज करून तिला बस स्थानकावर बोलावून तेथून तिचे अपहरण केले होते. काही नागरिकांना ही अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत असलेला अमन मोमीन हा गंगामाई घाटावर आढळून आला.

पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आरोपी मेसेज करत होता. वडिलांच्या मोबाईलवर सुरू असलेले हे प्रेमचाळे या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या मुलीची आरोपीशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यातूनच पीडित मुलगी आणि आरोपी यांचा संपर्क होत असे.

रविवारी सायंकाळी चार वाजता काही नागरिकांना ही अल्पवयीन मुलगी एका तरुणासोबत गंगामाई घाटावर एका आडोशाला आढळून आली. त्यामुळे संशय निर्माण झाल्याने काही नागरिकांनी तिची विचारपूस केले असता ही मुलगी अल्पवयीन असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांच्यात सुरू असलेले प्रेम चाळे लक्षात घेता नागरिकांनी दोघांनाही संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणले होते. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.

चौकशीअंती आरोपीने पीडित तरुणीला तिच्या वडिलांच्या इंस्टाग्रामवर मेसेज करून तिला संगमनेर बस स्थानकावर बोलावून घेतले होते. तेथे आधीच तयारीत असलेल्या आरोपीने तेथून त्याने तिला आपल्या दुचाकीवर प्रवरा नदीवरील गंगामाई घाटावर नेले असल्याचे समोर आले. शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अमन मोमीन यांच्या विरोधात अपहरण आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 680
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar01/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कामाची सुरुवात…

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.