Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीचा पाठलाग… छेड काढणाऱ्या तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग… छेड काढणाऱ्या तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा

लव्ह जिहादचे प्रकार समोर येत असताना संगमनेरातील वाढत्या घटनांनी भीतीचे वातावरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
वर्दळीच्या नवीन नगर रोड परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून एका दुकानात काम करणाऱ्या मुलीचा सलग दोन दिवस पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमान शब्बीर सय्यद (कब्रस्थान जवळ, नाईकवाडपुरा, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. सर्वत्र लव्ह जिहादचे प्रकार समोर येत असताना संगमनेरातील अशा वाढत्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी, नुकतेच बारावीचे पेपर दिलेली साडे सतरा वर्षाची मुलगी गेल्या चार-पाच दिवसांपासून नवीन नगर रोड परिसरातील एका दुकानांमध्ये काम करत असून बुधवारी डोक्यात मुस्लिम समाजात घातली जाते तशी पांढरी टोपी घातलेला मुलगा दुकानातील या मुलीकडे बघत एक सारख्या फेऱ्या मारत हाताच्या इशाऱ्याने तिला हाय करत होता.

संध्याकाळी सातच्या सुमारास ही मुलगी घरी जात असताना या मुलाने तिचा छुपा पाठलाग करत नवीन नगर रोडवरील प्रशासकीय इमारतीजवळ शुक-शुक करत तिला थांबविले. यावेळी मुलीने त्याला दुकानासमोर चकरा मारत असताना विनाकारण हाय करत होतास, आता माझ्या पाठीमागे पाठलाग करत आलास, तू कोण आहेस, मी सामान्य कुटुंबातील मुलगी असून माझ्या नादी लागू नकोस, असे त्याला सांगत निघून जाण्यास सांगितले. तू जशी पण असशील तशी मला चालेल, असे त्या मुलाने तिला म्हटल्यानंतर घाबरलेली ती मुलगी पुढे चालू लागली. त्याने पुन्हा तिचा पाठलाग केल्याने तिने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो तिथून पळून गेला. घरी गेल्यानंतर मुलीने हा प्रकार आई आणि बहिणीला सांगितला होता.

त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी हा मुलगा पुन्हा दुकानासमोर आल्यानंतर मुलीने फोन करून याची माहिती घरच्यांना दिली. संध्याकाळी ही मुलगी घरी परतत असताना तिची आई आणि बहीण तिच्या मागे काही अंतरावर होते. या दरम्यान हा मुलगा पुन्हा तिचा पाठलाग करत होता. याची मुलीने आई-बहिणीला माहिती दिल्यानंतर त्यांनी या मुलाला एका रुग्णालयासमोर पकडले असता तो त्यांच्या तावडीतून निसटून पळून जाऊ लागला.

त्यामुळे परिसरातील काही लोकांनी त्याला पुन्हा पकडले. त्यातील काहींनी त्याला मारहाण देखील केली. तेथून त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस चौकशीत त्याने त्याचे नाव अमान शब्बीर सय्यद असे असल्याचे सांगितले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी सय्यद याच्या विरोधात छुपा पाठलाग करणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,211
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.