Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात नेमकं चाललय काय! नवीन वाळू धोरण धाब्यावर… महसूलच्या कारवाईत पुन्हा जेसीबी, ट्रॅक्टर पकडला
गुन्हेगारी

संगमनेरात नेमकं चाललय काय! नवीन वाळू धोरण धाब्यावर… महसूलच्या कारवाईत पुन्हा जेसीबी, ट्रॅक्टर पकडला

तुम्ही कितीही कायदे करा आम्ही तोडणारच, तस्करांना महसूलमंत्र्यांना हेच तर सुचवायचे नाही ना!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/05/2023Updated:03/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
नवे वाळू धरण अस्तित्वात येण्याच्या पूर्वसंध्येला संगमनेरच्या महसूल विभागाने खांडगावमध्ये केलेल्या कारवाईत जेसीबी आणि वाळू साठा ताब्यात घेतल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, महसूलने पुन्हा एकदा केलेल्या कारवाईत जेसीबीसह ट्रॅक्टर पकडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या घटनांमधून गौण खनिज तस्करांशी संबंधितांची नावे देखील पुढे येऊ लागली आहेत.

दोन दिवसांपूर्वी खांडगावमध्ये झालेल्या कारवाईमध्ये चेतन साकोरे तर काल रात्री केलेल्या कारवाईत राहुल घुले याचे नाव समोर आले आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू तस्करी, गौण खनिज लूट थांबविण्यासाठी राज्यभरात नवे वाळू धोरण आणले आहे. महाराष्ट्र दिनापासून या नव्या धोरणाची राज्यात विशेष अहमदनगरमध्ये सुरुवात देखील झाली आहे. महसूल मंत्र्यांचे विशेष लक्ष असलेल्या संगमनेरमध्ये मात्र या नव्या धोरणाला हरताळ फासला जात असल्याचे महसूलच्या कारवाईतून समोर येत आहे. तुम्ही कितीही कायदे करा आम्ही तोडणारच, वाळूतस्करांना महसूलमंत्र्यांना हेच तर सुचवायचे नाही ना, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तीन दिवसातील दोन कारवाईंमधून संगमनेरातील वाळू तस्करी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे.

संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथे जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे मंगळवारी रात्री नायक तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी मंडलाधिकारी आणि तलाठ्यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. तेथे मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे मुरूम उत्खनन होत असल्याचे पथकाला दिसून आले.

पथकाने घटनास्थळी कारवाई सुरू करत तेथे गौण खनिज उत्खननासाठी वापरला जाणारा जेसीबी आणि एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला. कारवाईदरम्यान येथून चार ट्रॅक्टर गायब करण्यात आल्याची देखील चर्चा सुरू आहे. महसूलच्या पथकाच्या कारवाईत जवळपास 25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे सांगितले जाते.

कारवाईतील जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त करून पोलीस ठाण्याच्या वसाहतीत लावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी महसूल खाते संबंधितांवर केवळ दंडात्मक कारवाई करणार की पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात हे लवकरच पुढे येईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 766
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.