Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामात लाचखोरी; संगमनेर पालिकेतील योजनेचा अभियंता ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकला
गुन्हेगारी

प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामात लाचखोरी; संगमनेर पालिकेतील योजनेचा अभियंता ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकला

पैसे घेण्यासाठी तांदळाच्या दुकानात गेला आणि अडकला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/05/2023Updated:04/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी सतरा हजार रुपयांची लाचखोरी करणारा संगमनेर नगर परिषदेतील कंत्राटी अभियंता बुधवारी नाशिक ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहात पकडला. विकास सुरेश जोंधळे (वय 28 वर्ष, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) असे गरिबांसाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी लाचखोरी करणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे.

कोणत्याही शासकीय कामासाठी लाचखोरीचे ग्रहण लागलेल्या संगमनेरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी तलाठ्यासह एक खासगी इसम छत्तीस हजार रुपयांची लाचखोरी करताना ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यापाठोपाठ बुधवारी दुसरी घटना समोर आली आहे. किरकोळ कामासाठीदेखील नागरिकांना अधिकाऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. शहर पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री दोन वाजता या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरिबांना घरे बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. मात्र या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची घरे मंजूर करण्यासाठी ही पैसे घेतले जात असल्याचे समोर आले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या योजनेचा संगमनेर नगर परिषदेतील विकास सुरेश जोंधळे हा संगमनेर नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सी.एल.टी.सी. (टेक्निकल सेल) अभियंता म्हणून काम पाहत आहे.

त्याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यास रक्कम खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात व उर्वरित रक्कम शिफारस कडून लवकर काढून देण्याच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती लाभार्थ्याकडून वीस हजार रुपये घेण्याचे निश्चित झाले होते. त्यातील पहिला हप्ता म्हणून सतरा हजार रुपयांची लाच घेताना तो नासिक ‘एसीबी’च्या जाळ्यात बुधवारी सायंकाळी अडकला आहे.

संगमनेर शहरातील मोगलपुरा भागात एका तांदळाच्या दुकानात विकास जोंधळे हा संबंधितांकडून सतरा हजार रुपयांची लाच घेताना पकडला गेला. एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, नितीन कराड, वाहन चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली पकडल्या गेलेल्या जोंधळ्याची शासकीय विश्रामगृहामध्ये कसून चौकशी करण्यात आली.

जोंधळे यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी होण्याची आवश्यकता…
गेल्या चार वर्षापासून संगमनेर नगर परिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली या योजनेचे काम करणाऱ्या जोंधळे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या तसेच काम पूर्ण झालेल्या सर्वच लाभार्थ्यांची नासिक एसीबीने चौकशी केल्यास या योजनेच्या कामातील मोठा गैरव्यवहार समोर येण्याची चिन्हे आहेत. तसेच जोंधळे यांचे गैरव्यवहारातील आणखी साथीदार देखील समोर येऊ शकतात. अल्पावधीतच या कंत्राटी अभियंत्याने योजनेच्या माध्यमातून मोठी माया गोळा केल्याचे तसेच या अभियंत्याचे उच्चभ्रू राहणीमान देखील या कारवाईमुळे चर्चिले जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,318
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.