Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शुक्रवारी ठरणार बाजार समितीचे कारभारी; आमदार बाळासाहेब थोरात करणार सभापती, उपसभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब
शेती व सहकार

शुक्रवारी ठरणार बाजार समितीचे कारभारी; आमदार बाळासाहेब थोरात करणार सभापती, उपसभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब

विखे गटाचा मोठा पराभव करत एकहाती राखले होते वर्चस्व
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 11, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाचा सपशेल पराभव करत सत्ता कायम राखलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील बाजार समितीचे सभापती, उपसभापती शुक्रवारी (ता.12 मे) निवडले जाणार आहेत. प्रतिष्ठेच्या असलेल्या या दोन्ही पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.

बाजार समितीचे सभापती, उपसभापती निवडण्यासाठी नूतन संचालकांचे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत आमदार थोरात यांनी निश्चित केलेल्या नावांना सहमती दर्शविली जाईल. सभापतीपदावर थोरात माजी सभापती शंकर खेमनर यांना पुन्हा संधी देतात की या पदासाठी दुसरे नाव समोर येते हे शुक्रवारीच कळणार आहे. आगामी विधानसभेचे गणित लक्षात घेता थोरात दोन्ही नावे विचारपूर्वक निवडून समतोल साधण्याची चिन्हे आहेत.

बाजार समितीच्या इतिहासात बिनविरोध निवडीची असलेली परंपरा यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाने मोडीत काढली. थोरात यांच्या उमेदवारांविरोधात भारतीय जनता पक्षासह अन्य पक्षातील तगडे उमेदवार देऊन थोरात यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र निवडणुकीमध्ये विखे गटाच्या सर्वच उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. एका मतदार संघात तर विखेंच्या उमेदवाराला अवघ एक मत मिळालं होतं. या निवडणुकीत थोरात यांनी आपलं असलेलं एकहाती वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं.

एकमेव अपक्ष म्हणून निवडून आलेले एकमेव उमेदवार देखील थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळात सहभागी झाल्याने उद्या होणारी सभापती, उपसभापतीची निवडणूक बिनविरोध पार पडेल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 240
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा

May 26, 2026

संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळालीच पाहिजे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

May 18, 2026

राजहंसच्या ‘मिशन ५० लिटर’मुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती; पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांचे प्रतिपादन

March 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | शिर्डी: राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही अत्यंत निर्दयपणे कत्तलीच्या…

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.