Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चॅम्पियनशीप! राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचे यश
क्रिडा व कला

चॅम्पियनशीप! राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचे यश

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 11, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

परभणी जिल्ह्यातील सेलू येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात लातूरचा तर, एकोणावीस वर्षांखालील गटात नागपूरच्या संघाचा पराभव करीत ध्रुव ग्लोबलच्या संघाने चॅम्पियनशीपचा किताब पटकाविला. परभणी जिल्हा आणि सेलू तालुका क्रीडा कार्यालयाने या स्पर्धांचे आयोजन केले होते.

पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या 17 वर्षांखालील संघाने साखळी सामन्यात मुंबईचा 2 विरुद्ध शून्य असा एकतर्फी तर कोल्हापूरचा 2 विरुद्ध 1 अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत धडक घेतली. अतिशय अतितटीच्या अंतिम सामन्याच्या दुसर्‍या सत्रात ध्रुवच्या खेळाडूंनी आघाडी घेत लातरच्या संघाला 4 विरुद्ध दोन अशा अंतराने धूळ चारतांना विजेतेपद पटकाविले.

या गटात ध्रुवच्या ग्लोबलच्या संघाकडून ध्रुव भंडारी, अभिषेक व्यास, सिद्धांत ललवाणी, पार्श कासवा, वेदांत माली, ओम साठे, राघव भुतडा आणि कृष्णा लामखडे आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या स्पर्धेतील एकोणावीस वर्षांखालील गटातही ध्रुव ग्लोबलच्या संघाने आपला दबदबा कायम ठेवतांना साखळीतील पहिल्या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाचा 3 विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकाने पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. या फेरीत नाशिकसोबत झालेल्या रंगतदार सामन्यात अखेरच्या सत्रात सरशी मिळवताना ध्रुव ग्लोबलने 2 विरुद्ध 1 गुणांनी अंतिम फेरी गाठली. नागपूर संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यातही सातत्य राखतांना ध्रुव ग्लोबलच्या संघाने 3 विरुद्ध 2 अशा अंतराने नागपूरचा पराभव करीत विजय मिळवला.

प्रेम बाफना, मीत भंडारी, सुरज कोकाटे, साईप्रसाद साठे, प्रत्युष लोहिया, संकिर्ण रहाणे आणि रुद्र व्यास या ध्रुव ग्लोबलच्या खेळाडूंनी पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व करतांना यश संपादन केले. स्पर्धेत उत्तुंग कामगिरी बजावणार्‍या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सर्व खेळाडूंची लवकरच होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शाळेचे क्रीडा प्रशिक्षक नीलेश पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 333
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

April 22, 2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

March 29, 2026

महिलांच्या कर्तृत्वाला एकविरा फाउंडेशनचे मोठे व्यासपीठ: थोरात ४४२५ खेळाडूंच्या सहभागाने क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

March 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | शिर्डी: राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही अत्यंत निर्दयपणे कत्तलीच्या…

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.