Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तो खून चोरट्यांनी नव्हे तर पत्नीनेच केल्याचे निष्पन्न; अकोले तालुक्यातील खुनाचा राजुर पोलिसांनी केला काही तासातच उलगडा
गुन्हेगारी

तो खून चोरट्यांनी नव्हे तर पत्नीनेच केल्याचे निष्पन्न; अकोले तालुक्यातील खुनाचा राजुर पोलिसांनी केला काही तासातच उलगडा

अखेर ते कारण ठरले बनाव
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

राजुर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

चोरट्यांनी चोरी करताना केलेल्या मारहाणीत अकोले तालुक्यातील वाकी येथे मधुकर किसन सगभोर यांचा खून झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. दोन दिवसांच्या पोलीस तपासानंतर हे प्रकरण वेगळाच वळणावर येऊन थांबले. सातत्याने होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नीने पतीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणामागील बनाव देखील उघडा पाडण्यात पोलीस यशस्वी ठरले.

मधुकर सगभोर हे सातत्याने दारू पिऊन पत्नी, मुलांना मारहाण करणे, मद्यप्राशन करून घरामध्ये राडा करणे अशा प्रकारचे कृत्य करत असल्याने कारणाने वैतागलेल्या पत्नीच्या हातून पतीचा खून झाल्याचे समोर आले. घटनेच्या दिवशी देखील मुलाने त्यांना मद्यप्राशन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून त्यांनी मुलाला मारहाण देखील केली होती. रात्री मधुकर सगभोर हे मद्यप्राशन करून घरी आले होते.

घरी आल्यावर त्यांनी वाद घालण्यास सुरुवात करत पत्नीला मारहाण केली होती. त्यामुळे झालेल्या वादामध्ये तो भिंतीवर जाऊन आदळल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. तरीदेखील तो पत्नी पुष्पा हिला मारू लागल्याने तिने हातातील बटाटे शिलण्याचे यंत्र मधुकर सगभोर यांना फेकून मारले होते. त्यामुळे त्यांना मोठी जखम देखील झाली.

त्या रात्री मधुकर सगभोर हे न जेवता झोपी गेले होते. रक्तस्त्रावामुळे त्यांचा झोपेतच मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यामुळे सकाळी उठल्यावर लोकांना काय सांगायचे असा प्रश्न पडलेल्या पत्नीने चोरट्यांनी चोरी करताना केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. या प्रकारामुळे अकोले तालुक्यात खळबळ उडाली होती. दरम्यान राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मयत मधुकर सगभोर याची पत्नी पुष्पा मधुकर सगभोर हिला विश्वासात घेत चौकशी केली असता चोरट्यांच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूचा बनाव समोर आला.

पोलिसांनी पुष्पा मधुकर सगभोर हिला ताब्यात घेतले आहे. अवघ्या काही तासातच राजुर पोलिसांना खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 651
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.