Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

July 20, 2026

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पुन्हा शंकरराव खेमनर तर उपसभापतीपदी गीताराम गायकवाड
शेती व सहकार

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पुन्हा शंकरराव खेमनर तर उपसभापतीपदी गीताराम गायकवाड

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 12, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव खेमनर यांची फेरनिवड तर उपसभापतीपदी गीताराम गायकवाड यांची निवड करण्यात आली.

बाजार समितीचे सभापती उपसभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव सतीश गुंजाळ यांनी काम पाहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत अध्यक्षपदासाठी शंकरराव खेमनर यांच्या नावाचे सूचना संचालक कैलास पानसरे यांनी मांडली. संचालक निलेश कडलग यांनी त्यांच्या नावास अनुमोदन दिले. उपसभापती पदासाठी गीताराम गायकवाड यांच्या नावाचे सूचना संचालक अरुण वाघ यांनी मांडली. या सूचनेला संचालक सतीश खताळ यांनी अनुमोदन दिले. सभापती उपसभापतींच्या निवडी एकमताने झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कांदळकर यांनी जाहीर केले.

बाजार समितीचे सभापतीपद खेमनर यांना तर उपसभापतीपद गायकवाड यांना मिळाल्याने साकुर आणि आश्वी भागात थोरात यांनी राजकीय समीकरणे भक्कम करण्यासाठी पाऊले उचलल्याचे मानले जात आहे. सभापती, उपसभापतीसह नव्या संचालकांचा माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यशोधन जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय फटांगरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, बापूसाहेब गिरी, यांच्यासह नूतन संचालक कैलास पानसरे, सुरेश कान्होरे, सतीश खताळ, मनीष गोपाळे, सुधाकर ताजने, अनिल घुगे, सखाराम खेमनर, सौ. दिपाली भाऊसाहेब वर्पे, सौ. रुक्मिणी शिवाजी साकोरे, मनसुख भंडारी, शेख निसार गुलाब, अरुण वाघ, संजय खरात, निलेश कडलग, विजय सातपुते, सचिन करपे आदी उपस्थित होते. थोरात यांच्यासह आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, डॉक्टर जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात आदींसह विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

????️‍????️

संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्था ह्या राज्याला आदर्शवत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या गुणवत्तापूर्ण कामातून राज्यात लौकिक निर्माण केला आहे. शेतकरी व्यापारी यांना अत्याधुनिक सुविधा देताना विविध ठिकाणी उपबाजार सुरू केले आहे. नेतृत्वाची समृद्ध परंपरा लाभलेल्या या बाजार समितीमध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळ हे चांगले काम करताना या बाजार समितीचा गौरव वाढवतील असा विश्वास यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 411
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

July 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून…

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.