Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायालयातील निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेण्यासाठी दोन लाखाची मागणी करणारा वकील ‘एसीबी’ने पकडला
गुन्हेगारी

न्यायालयातील निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेण्यासाठी दोन लाखाची मागणी करणारा वकील ‘एसीबी’ने पकडला

जिल्हा न्यायालय आणि वकिलांमध्ये खळबळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/05/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सातारा (महाराष्ट्र संवाद न्यूज)

जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या प्रोबेट अर्जाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी दोन लाखाची मागणी करणारा आणि त्यासाठी एक लाख रुपये लाच स्वीकारणारा खाजगी वकील एसीबीने रंगेहात ताब्यात घेतला आहे. विलास बाळकृष्ण कुलकर्णी असे या वकिलाचे नाव आहे.

या घटनेतील तक्रारदार हे एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून सातारा दिवाणी न्यायालयात शिक्षण संस्थेच्या वतीने प्रोबेट अर्ज दाखल आहे. लोकसेवकावर प्रभाव पाडून या अर्जाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेण्यासाठी वकील कुलकर्णी यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगत पैशाची मागणी केली होती.

त्यामुळे तक्रारदाराने सातारा विभागाच्या पोलीस उपाधीक्षक उज्वल वैद्य यांच्याशी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती. वैद्य यांनी लाचखोर वकिलाला पकडण्यासाठी सापळा लावला. वकील वैद्य याला दोन लाख रुपयांपैकी एक लाख रुपये घेताना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. आरोपी विरोधात सातारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९९८ चे कलम ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पुणे परिक्षेत्राचे एसीबीचे अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पोलीस उप अधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य यांच्या नेतृत्वाखालील निलेश येवले, तुषार भोसले, शितल सपकाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली. वकिलालाच एसीबीने तब्बल एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना पकडल्याने जिल्हा न्यायालयासह वकिलांमध्ये खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 769
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.