Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साताऱ्यातील वकिलापाठोपाठ नाशिकमध्येही एका वकिलासोबत सहकार विभागाचा बडा मासा एसीबीच्या जाळ्यात; तीस लाख रुपये लाच घेताना दोघांना पकडले
गुन्हेगारी

साताऱ्यातील वकिलापाठोपाठ नाशिकमध्येही एका वकिलासोबत सहकार विभागाचा बडा मासा एसीबीच्या जाळ्यात; तीस लाख रुपये लाच घेताना दोघांना पकडले

राज्याच्या सहकार विभागात खळबळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज)

साताऱ्या पाठोपाठ नाशिकमध्येही एसीबीने मोठी कामगिरी केली असून तब्बल तीस लाख रुपयांची लाच घेताना एका वकिलासह सहकार विभागाचा बडा मासा एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला आहे. यामुळे राज्याच्या सहकार विभागात खळबळ उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाचा निर्णय बाजूने लावून देण्याच्या बदल्यात तीस लाखाच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी तक्रारदार निवडून आले आहे. त्यांच्या निवडी विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन या सुनावणीचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (वय ५७ वर्ष, रा. फ्लॅट नंबर २०१, आई हाईटस्, कॉलेज रोड, नाशिक व खाजगी इसम वकील शैलेश सुमतीलाल सभद्रा (वय ३२ वर्ष, रा. गंगापूर रोड नाशिक) यांनी तक्रारदाराकडे तीस लाख रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदार संचालकाने या विरोधात नाशिक एसीबीसी संपर्क करत माहिती दिली. नासिक एसीबीने पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी संध्याकाळी लाचखोरांना पकडण्यासाठी एसीबीचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांच्या पथकाने सापळा रचला होता.

सोमवारी संध्याकाळी तक्रारदाराकडून तीस लाख रुपयांची लाच घेताना नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना त्यांच्या राहत्या घरी वकील शैलेश सभद्रा याला रंगेहात पकडले. सोमवारी संध्याकाळी झालेल्या या कारवाईमुळे राज्याच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. लाचखोरीची तब्बल तीस लाख रुपयांची भूक असलेला जिल्हा निबंधक खरे हा बडा मासा एसीबीच्या जाळ्यात अडकला असल्याने या अधिकाऱ्यांवरील कारवाईमुळे सहकार विभागाचे इभ्रत चव्हाट्यावर आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 555
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.