Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संस्कार बालभवनचा डंका विशाखापट्टणममध्ये; राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत 39 सुवर्णसह 50 पदकांची लयलुट
क्रिडा व कला

संस्कार बालभवनचा डंका विशाखापट्टणममध्ये; राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत 39 सुवर्णसह 50 पदकांची लयलुट

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या आठव्या राष्ट्रीय क्रीडा नृत्य स्पर्धेत गीता परिवार संचलीत संस्कार बालभवनच्या मुलांनी देदीप्यमान यश मिळवले. स्पर्धेच्या प्रारंभापासून वर्चस्व प्रस्थापित करतांना बालभवनाच्या नृत्य कलाकांरानी 39 सुवर्णपदकांसह एकूण 50 पदकांची लयलुट केली. वैयक्तीक व सांघीक अशा दोन्ही प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवणार्‍या बालभवनला या राष्ट्रीय स्पर्धेचे अजिंक्यपद देण्यात आले.
या स्पर्धेत बालभवनचे 25 नृत्य कलाकार सहभागी झाले होते. 13 वर्षांखालील मुलींच्या वैयक्तीक शास्त्रीय नृत्यप्रकारात रीत चेतन राजपाल, 17 वर्षांखालील गटातील अदिती राजेश लाहोटी यांनी उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर पहिल्या क्रमांकासह सुवर्णपदक मिळवले. 21 वर्षांखालील गटात जीया अमित बाफनाने रौप्यपदक व रिया गोपाल साकीने कांस्यपदकाची कमाई केली. 17 वर्षांखालील मुलींच्या द्वंद्व नृत्य प्रकारात सौम्या सचिन जोशी व श्रिया अमोल मुळे यांनी सुवर्णपदक मिळवतांना बालभवनच्या यशाला सुवर्ण झळाळी दिली.
सांघीक प्रकारातही बालभवनने धमाल उडवतांना 13 वर्षाखालील मुलींच्या लोकनृत्य प्रकारात सुवर्णपदकांसह रौप्य पदके पटकावली. आराध्या सुरेश रहाणे, काव्या स्वप्नील माळवे, तनिष्का मोहन आहेर, सोहम निमनाथ चौधरी, ओवी बाळासाहेब ठोंबरे, आद्या गिरीश डागा, दर्शी पंकज पटेल, मधुरा राजू कानवडे व आराध्या जनार्दन पुजारी यांचा या संघात समावेश होता.
21 वर्षाखालील मुलींच्या शास्त्रीय आणि लोकनृत्य प्रकारात सुवर्णपदक मिळविणार्‍या बालभवनच्या संघात रिया गोपाल साकी, यशोधरा लक्ष्मीकांत नाईकवाडी, ईश्‍वरी गोकुळ खताळ, पृथा हृषीकेश मोंढे, अनुष्का संतोष जाधव, भक्ती उमेश रत्नपारखी, आर्या प्रशांत भालेराव, मनसा ओमप्रकाश कालडा, मधुरा दादासाहेब गुंजाळ, आदिश्री उमेश झंवर व मिताली राजेंद्र भडांगे यांचा समावेश होता.
यशोधरा लक्ष्मीकांत नायकवडी, ईश्‍वरी गोकुळ खताळ, सौम्या सचिन जोशी, रीत चेतन राजपाल, श्रिया अमोल मुळे, पृथा हृषीकेश मोंढे, जीया अमित बाफना व आदिती राजेश लाहोटी यांनी 2 शास्त्रीय लोकनृत्य प्रकारात 17 वर्षाखालील गटात बालभवनच्या संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. स्पर्धेत वर्चस्व गाजवणार्‍या बालभवनच्या स्पर्धकांनी 39 सुवर्णपदकांसह दहा रौप्य व एक कांस्यपदक मिळवतांना ही स्पर्धा गाजवली. नृत्य प्रशिक्षिका सोनाली महापात्रा यांनी बालभवनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 594
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.